चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख फलंदाज सुरेश रैनाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून अचानक माघार घेतली. रैना हा आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वाधि
चेन्नई संघही माझ्या कुटुंबाप्रमाणेच
मला माझ्या कुटुंबासाठी भारतात परतावे लागले. हा माझा वैयक्तिक निर्णय होता. माझ्या घरी काही अवघड परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मला कुटुंबासोबत राहायचे होते. चेन्नई संघही माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे आणि धोनीला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अचानक मायदेशी परतण्याचा निर्णय घेणे मला अवघड गेले, असे रैना एका मुलाखतीत म्हणाला.
आणखी ४-५ वर्षे आयपीएल स्पर्धेत खेळत राहायचेय
माझ्यात आणि चेन्नईच्या संघात कोणताही वाद नाही. कोणतीही व्यक्ती १२.५ कोटी रुपयांकडे उगाचच पाठ फिरवणार नाही. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो, तरी मला आणखी ४-५ वर्षे आयपीएल स्पर्धेत खेळत राहायचे आहे. इथे क्वारंटाईनमध्ये असतानाही मी क्रिकेटचा सराव करत होतो. आता मी पुन्हा युएईमध्ये परतून चेन्नई संघात दाखल होण्याची आणि आयपीएल खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही रैनाने सांगितले.