घरक्रीडाIPL 2022: सुरेश रैनाला फिल्डींग कोच बनवण्याची चाहत्यांची मागणी; कर्णधार जडेजा सोशल...

IPL 2022: सुरेश रैनाला फिल्डींग कोच बनवण्याची चाहत्यांची मागणी; कर्णधार जडेजा सोशल मीडियावर ट्रोल

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाला अद्याप चांगली कामगिरी करता येत नाहीये. क्रिकेटप्रेमींच्या चर्चेमध्ये नेहमीच अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईच्या संघावर यंदा चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाला अद्याप चांगली कामगिरी करता येत नाहीये. क्रिकेटप्रेमींच्या चर्चेमध्ये नेहमीच अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईच्या संघावर यंदा चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या पर्वात चेन्नईने आतापर्यंत 8 सामने खेळले असून यापैकी 6 सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र सततच्या पराभवामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा सुरेश रैनाची आठवण झाली आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांमध्ये सध्या सुरेश रैनाची चर्चा जोरदार सुरू आहे. चेन्नईचा संघ पराभवाचा सामना करत असल्यानं आता संघात सुरेश रैनाची गरज असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, चेन्नईचा नवा कर्णधार रविंद्र जडेजा याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. त्यासोबतच चाहत्यांनी शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.

- Advertisement -

सुरेश रैनाला फिल्डींग कोच बनवण्याची मागणी

चेन्नईचा सामना सोमवारी पंजाब किंग्जविरुद्ध झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने 11 धावांनी चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला. या पराभवानंतर चाहत्यांना सुरेश रैनाची आठवण झाली आहे. एका युझरने चेन्नईच्या टीमकडे सुरेश रैनाला फिल्डींग कोच बनवण्याची मागणी केली आहे. चेन्नईच्या डगआऊटला रैनाची गरज असल्याचंही या चाहत्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युझरने, आम्ही सुरेश रैनाला मीस करत असल्याचं म्हटलं आहे. तर, सुरेश रैना एक उत्तम फिल्डर असल्याचंही, एका युझरने ट्विट केलं आहे. तर फिल्डींगच्याबाबतीत सुरैश रैनाचा हात कोणीही पकडू शकत नाही, असंही एकाने म्हटलं आहे. तसंच रैनाशिवाय चेन्नईचं काहीही होणार नाही, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

चेन्नईसमोर विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्जने धडाकेबाज खेळी केली. सलामीला आलेला शिखर धवन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता. त्याने ५९ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ८८ धावा केल्या. तर धवनसोबत आलेला मयंक अग्रवाल फक्त १८ धवाकरु शकला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या भानुका राजपक्षे याने धवनला साथ देत ४२ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने १९ तर बेअरस्टोने ६ धावा केल्या. धवन आणि राजपक्षेच्या खेळीमुळे पंजाबने चेन्नईसमोर विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य ठेवले.


हेही वाचा – IPL 2022: ऋषी धवनचे तब्बल ६ वर्षांनी पुनरागमन; पण चेहऱ्यावरच्या फेस शिल्डची जोरदार चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -