घरक्रीडावृद्धिमान साहावर शस्त्रक्रिया

वृद्धिमान साहावर शस्त्रक्रिया

Subscribe

पाच आठवड्यांच्या आत फिट होण्याची शक्यता

भारताचा प्रमुख कसोटी यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या उजव्या हाताच्या बोटावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकत्याच कोलकात्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटी सामन्यादरम्यान साहाच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भारताची पुढील कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणार आहे. त्या मालिकेआधी साहा फिट होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने हात आणि मनगटाच्या विशेषज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी साहावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मंगळवारी मुंबईमध्ये त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया झाली, असे बीसीसीआयने आपल्या पत्रकात लिहिले.

- Advertisement -

भारतीय संघ पुढील वर्षी न्यूझीलंडच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारत दोन कसोटी सामने खेळणार असून त्यातील पहिला सामन्याला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या सामन्याआधी साहा पूर्णपणे फिट होईल अशी भारतीय संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

तसेच या दुखापतीविषयी साहाने सांगितले, माझी दुखापत फारशी गंभीर नाही. मला पूर्णपणे फिट होण्यासाठी पाच आठवड्यांपेक्षा जास्त काळ लागेल असे वाटत नाही. मी आता थोडी विश्रांती घेऊन त्यानंतर बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -