घरक्रीडासूर्यकुमारने थर्ड मॅनला मारलेल्या षटकार विशेष; सचिन तेंडुकरकडून खास ट्वीट

सूर्यकुमारने थर्ड मॅनला मारलेल्या षटकार विशेष; सचिन तेंडुकरकडून खास ट्वीट

Subscribe

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्धच्या सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) शेवटच्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने मारलेल्या षटकाराचे सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सामन्याच्या वेळी हातवारे करून कौतुक केले होते, पण यानंतर त्याने सूर्यकुमारसाठी खास ट्वीट करत पुन्हा एकदा कौतुक केले आहे.

आयपीएल 2023 च्या 16 व्या हंगामात शुक्रवारी (12 मे) मुंबईच्या वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रोमांचक लढत पार पडली. या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजी करण्याची संधी दिली. यावेळी मुंबईकडून मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने वादळी खेळी केली. त्याने 49 चेंडूचा सामना करताना 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावा केल्या. यावेळी त्याचा रनरेट 210 एवढा होता. यावेळी त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिले शतक पूर्ण केले.

- Advertisement -

सूर्यकुमारची ही खेळी मुंबई इंडियन्सच्या चाहत्याच्या कायम स्मरणात राहिल. पण अजून एक व्यक्ती असा आहे ज्याच्या स्मरणात ही खेळी कायम लक्षात राहिल. तो म्हणजे क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. या सामन्यात सूर्यकुमारची खेळी पाहताना सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावरील हावभाग पाहण्यासारखे होते. तो एका नवीन क्रिकेट चाहत्याप्रमाणे सूर्यकुमारच्या खेळीचा आनंद घेत होता.

या सामन्यात मोहम्मद शमीच्या १९ वे षटक टाकण्यासाठी आला. यावेळी शमीच्या दुसऱ्याच चेंडूवर सूर्यकुमराने थर्ड मॅनच्या दिशेने षटकार मारला. सूर्यकुमारच्या या षटकाराचे कौतुक करण्यापासून सचिन स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने पियुष चावलाला षटकार कसा गेला हे हातवारे करुन दाखवले. यानंतर सचिनने सूर्यकुमारसाठी खास ट्विट केले आहे.

- Advertisement -

या ट्वीटमध्ये सचिनने सूर्याकुमारच्या फलंदाजीचे कौतुक करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने ट्वीटमध्ये म्हटले की, सूर्यकुमारने आज चांगले शॉट मारले, पण माझ्यासाठी थर्ड मॅनच्या दिशेने मारलेल्या षटकार थास आहे. सूर्या ज्या प्रकारे बॅटिंग करताना बॅटचा अँगल ब्लेडसारखा करतो ते खूप कठीण आहे. जगातील निवडक खेळाडूंना ते जमतं, असं सचिन म्हणाला आहे. यावेळी त्याने मुंबई इंडियन्स आणि सूर्यकुमारच्या ट्विटरला टॅग केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -