घरक्रीडाIND vs ENG : सूर्यकुमारला भारतीय संघाची दारे उघडलीच! 

IND vs ENG : सूर्यकुमारला भारतीय संघाची दारे उघडलीच! 

Subscribe

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी शनिवारी भारताच्या संघाची घोषणा झाली. 

इंग्लंडविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी शनिवारी भारताच्या संघाची घोषणा झाली. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला अखेर संधी मिळाली आहे. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरही सूर्यकुमारची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नव्हती. परंतु, आता त्याचा संघात समावेश करण्यात आला असून ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांनाही संधी मिळाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये होणार असून या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

संजू सॅमसन संघाबाहेर

भारताने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून लोकेश राहुलसह रिषभ पंत आणि ईशान किशन यांना पसंती दर्शवली असून संजू सॅमसनला मात्र संघाबाहेर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील टी-२० मालिकेत सॅमसनला चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. तसेच गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून भुवनेश्वर कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे.


भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -