घरक्रीडाIND vs ENG : सूर्यकुमारला पदार्पणाची संधी? भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना आज 

IND vs ENG : सूर्यकुमारला पदार्पणाची संधी? भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना आज 

Subscribe

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीचा फायदा सूर्यकुमारला होऊ शकेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी पार पडेल. टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारने टी-२० मालिकेच्या अखेरच्या दोन सामन्यांत ५७ आणि ३२ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. आता एकदिवसीय संघात संधी मिळाल्याच चांगल्या कामगिरीचा त्याचा प्रयत्न असेल. तसेच पहिला एकदिवसीय सामना मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भारतीय संघाचे दुसरा सामना जिंकत तीन सामन्यांच्या या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य असेल.

खेळाडूंना लय सापडलेली दिसली

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात शिखर धवन, कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याने अर्धशतकी खेळी केली. तर गोलंदाजीत वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने पदार्पणात ४ विकेट घेत भारताच्या विजयाला हातभार लावला. भारताच्या जवळपास सर्वच खेळाडूंना लय सापडलेली दिसली. मात्र, या सामन्यात भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली.

- Advertisement -

रिषभ पंतचाही पर्याय

क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू अडवण्यासाठी श्रेयसने सूर मारला आणि त्यावेळी त्याचा खांदा दुखावला. त्यामुळे तो उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहे. श्रेयसच्या अनुपस्थितीचा फायदा सूर्यकुमारला होऊ शकेल. त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारने आतापर्यंत स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९८ सामन्यांत ३ शतके आणि १७ अर्धशतकांच्या मदतीने २७७९ धावा केल्या आहेत. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज म्हणून भारताकडे सूर्यकुमारसोबतच रिषभ पंतचाही पर्याय आहे. त्यामुळे भारतीय संघ या दोघांपैकी कोणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -