घरक्रीडावर्षभरात टी-२०मध्ये सूर्यकुमार यादवच्या १०००+ धावा; ठरला पहिला भारतीय खेळाडू

वर्षभरात टी-२०मध्ये सूर्यकुमार यादवच्या १०००+ धावा; ठरला पहिला भारतीय खेळाडू

Subscribe

टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव चांगलाच फॉर्मात आहे. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अशातच सूर्यकुमार यादवने २०२२ या कॅलेंडर वर्षात टी-२०मध्ये सर्वाधिक ११६४ धावा त्याने केल्या.

टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव चांगलाच फॉर्मात आहे. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अशातच सूर्यकुमार यादवने २०२२ या कॅलेंडर वर्षात टी-२०मध्ये सर्वाधिक ११६४ धावा त्याने केल्या. कॅलेंडर वर्षात टी-20मध्ये १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला असून, जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे. (suryakumar yadav number 1 ranking in t20 batter with 895 points he best t20i rating)

आयसीसीने फलंदाजांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये टी-२० क्रमवारीत मधळ्या फळीतील फलंदाज सूर्याचे वर्चस्व पाहायला मिळतेय. सूर्यकुमारने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखताना कारकीर्दितील सर्वाधिक रेटींग पॉईंड्सची नोंद केली. भारतीय संघात सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स ८९७ हे विराटच्या खात्यात आहेत, त्यानंतर सूर्यकुमार (८९५) व लोकेश राहुल (८५४) यांचा क्रमांक येतो.

- Advertisement -

भारतीय संघात २०२१मध्ये पदार्णाची संधी मिळाल्यानंतर सूर्याने तुफानी खेळी करत विरोध संघांच्या गोलंदाजांचा चांगलाच सामाचार घेतला. दरम्यना, कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ७ मॅन ऑफ दी मॅच पटकावण्याच्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याच्या विक्रमाशी सूर्यकुमारने बरोबरी केली. विराट कोहलीने २०१६ मध्ये सहा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकले होते. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २३९ धावा करणाऱ्या सूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही तुफानी खेळी केली.

भारत आणि न्यूझिलंड यांच्यात झालेल्या सामन्यात १२४ धावांसह मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. न्यूझिलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सूर्याने १११ धावांची खेळी केली. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २ शतक झळकावणारा सूर्या चौथा फलंदाज ठरला आहे. कॉलिन मुन्रो (न्यूझीलंड, २०१७), रोहित शर्मा (भारत, २०१८) व रिली रोसोवू (दक्षिण आफ्रिका, २०२२) यांनी हा पराक्रम केला आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याला केवळ १३ धावा करता आल्यामुळे त्याचे रेटींग पॉईंट ८९० इतके झाले. परंतु त्याने ५४ पॉईंट्सच्या फरकाने नंबर वन स्थान कायम राखले.

- Advertisement -

पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ८३६ पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे (७८८) याने पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (७७८) याला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले. इशान किशननेही १० स्थानांच्या सुधारणेसह ३३ वा क्रमांक पटकावला आहे. न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स १ स्थान वर, तर केन विलियम्सन ५ स्थान वर सरकून अनुक्रमे सातव्या व ३५ व्या क्रमांकाव आले आहेत.


हेही वाचा – आला…फिफा विश्वचषक २०२२ चा पहिला धक्कादायक निकाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -