घरक्रीडामानलं रे भाऊ... विराटच्या शतकी खेळीनंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं केलं कौतुक

मानलं रे भाऊ… विराटच्या शतकी खेळीनंतर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं केलं कौतुक

Subscribe

आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत झाली. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीचे शानदार शतक आणि कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने हैदराबादवर विजय मिळवला. या विजयासह बंगळुरूने प्ले ऑफचे आव्हान कायम राखले आहे. परंतु विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूनं कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. मानलं रे भाऊ… अशी पोस्ट सूर्यकुमार यादवने मराठीतून केली आहे.

- Advertisement -

विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चालू हंगामातील पहिले शतक झळकावले आहे. विराटचे हे सहावे आयपीएल शतक आहे. त्याने शेवटचे शतक 19 एप्रिल 2019 रोजी कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केले होते. त्यानंतर कोहलीने 1489 दिवसांनी आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचीही आयपीएलमध्ये 6 शतकं आहेत. 5 शतकांसह जॉस बटलर या यादीत गेल आणि कोहली यांच्या मागे आहे.

- Advertisement -

यापूर्वी 2016 च्या हंगामात विराटने 4 शतकं झळकावली होती. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 113 आहे. आपल्या सहाव्या शतकासह कोहलीने आयपीएलमधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना हेनरिक क्लासेनने शतक झळकावले. क्लासेनच्या शतकाच्या जोरावर संघाने 20 ओव्हर्समध्ये 5 गडी गमावून 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूने कोहलीचे शतक आणि फाफ डू प्लेसिससोबत केलेल्या 172 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 19.2 ओव्हर्समध्ये 2 गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले.


हेही वाचा : IPL 2023 : 1489 दिवसानंतर कोहलीच्या शतकानं बंगळुरूचा विजय, क्लासेनच्या शतकाला धक्का


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -