घरक्रीडासूर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 49 चेंडूत 111 धावा, 'या' विक्रमालाही घातली गवसणी

सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी, 49 चेंडूत 111 धावा, ‘या’ विक्रमालाही घातली गवसणी

Subscribe

टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव चांगलाच फॉर्मात आहे. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत शतकी खेळी केली.

टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव चांगलाच फॉर्मात आहे. या खेळीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत शतकी खेळी केली. या सामन्यात सूर्यकुमारने 51 धावांचा सामना केला असून, नाबाद 111 धावा केल्या. या शतकी खेळीच्या जोरावर सूर्यकुमारने एकाच वर्षात दोन आंतरराष्ट्रीय टी-20मधील विक्रमांना गवसणी घातली. (suryakumar yadav t20 record becomes 2nd indian batter to score two t20i centuries in calendar year 2022)

51 चेंडूतील 111 खेळीच्या जोरावर सूर्य कुमारने भारताचा कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. सूर्याने आज त्याच्या फलंदाजीमध्ये तब्बल 11 चौकार आणि 7 षटकार ठोकले. मैदानात चौफेर फटकेबाजी करत सूर्याने ठोकलेले अफलातून शॉट्स खरचं पाहण्याजोगे होते. या सामन्यात फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अखेरच्या काही षटकात तर कोणत्याही प्रकारचा चेंडू न्यूझीलंडचे फलंदाज टाकत असतानाही सूर्यकुमार सीमारेषेपलीकडे पाठवतच होता.

- Advertisement -

अखेरच्या षटकात त्याला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही. त्यामुळे तो नाबाद 111 धावाच करु शकला. विशेष म्हणजे सूर्याने अर्धशतक केल्यानंतर अधिक वेगाने उर्वरीत 50 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 200 पार गेल्याचे पाहायला मिळाले. 217.65 च्या स्ट्राईक रेटने त्याने या 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.

या सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. फलंदाजी करताना इशान किशान आणि रिषभ पंतने संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारनेही फटकेबाजी करत 49 चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं. भारत 200 पार जाईल असं वाटत होतं. पण अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं हॅट्रीक घेतली. ज्यामुळे भारत 191 धावा करु शकला.

- Advertisement -

हेही वाचा – FIFA WC: कतारमध्ये आजपासून रंगणार फुटबॉल विश्वचषक, 32 संघांमध्ये चुरस

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -