Syed Modi Badminton : सायना सेमी फायनलमध्ये

सायनाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रितुपर्णा दासचा २१-१९, २१-१४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

सौजन्य - india.com
भारताची बँडमिंटनपटू सायना नेहवालने सय्यद मोदी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने भारताच्याच रितुपर्णा दासचा २१-१९, २१-१४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सायनाने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे.

असा झाला सामना 

सायनाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रितुपर्णा दासचा २१-१९, २१-१४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याची सुरुवात तिच्यासाठी चांगली झाली नाही. या सामन्याच्या पहिल्या सेटच्या मध्यंतराला दासकडे ११-५ अशी मोठी आघाडी मिळवली. पण यानंतर सायनाने अप्रतिम पुनरागमन केले. तिने यानंतरचे सलग सात गुण मिळवत १२-११ अशी आघाडी मिळवली. हा सेट एकेवेळी १९-१९ असा बरोबरीत होता. पण सायनाने पुढील २ गुण मिळवत हा सेट २१-१९ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटच्या मध्यंतराला दासकडे ११-९ अशी आघाडी होती. पण सायनाने पुढील पाच गुण मिळवत १४-११ अशी आघाडी मिळवली. यानंतर तिने अधिकच आक्रमक खेळ करत हा सेट २१-१४ असा जिंकत सामनाही जिंकला.