घरक्रीडाPakistan Cricket Team : भारतीय दाखवणार पाकला विजयाचा मार्ग? प्रशिक्षक म्हणून 'या'चं...

Pakistan Cricket Team : भारतीय दाखवणार पाकला विजयाचा मार्ग? प्रशिक्षक म्हणून ‘या’चं नाव चर्चेत

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अजय जडेजा म्हणाला की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक समानता आहेत.

नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अजय जडेजा म्हणाला की, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक समानता आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला प्रशिक्षक बनवण्याची ऑफर दिल्यास तो ही भूमिका साकारण्यास तयार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तान संघाने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अफगाणिस्तान संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि नेदरलँड्सचा पराभव केला होता. अफगाण संघाच्या या अप्रतिम कामगिरीत अजय जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. ते संघाचे मार्गदर्शक होते. (T-20 World Cup 2024 Pakistan Cricket Team Pakistan team will get an Indian coach Ajay Jadeja )

वास्तविक, अजय जडेजाला पाकिस्तान संघाच्या कोचिंगबद्दल विचारण्यात आले होते. यावर जडेजाने सांगितले की, जर त्याला ही भूमिका ऑफर झाली तर त्याला पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक बनायला नक्कीच आवडेल. मी तयार असल्याचे जडेजाने स्पोर्ट तकला सांगितले आहे. मी अफगाणिस्तान संघासोबत काम केले आहे आणि मला विश्वास आहे की पाकिस्तान संघ देखील अफगाणिस्तानसारखाच आहे.

- Advertisement -

पाकिस्तान संघात मोठे बदल 

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाने आपल्या अनपेक्षित कामगिरीने बरीच चर्चा केली आहे. त्याचवेळी पाकिस्तान संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. पाकिस्तानी संघाला उपांत्य फेरीतही मजल मारता आली नाही. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमला पदावरून हटवण्यासह अनेक मोठे बदल केले आहेत.

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. जिथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तान संघाला कधीही ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 1995 पासून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात एकही कसोटी जिंकलेली नाही.

- Advertisement -

(हेही वाचा: T-20 World Cup 2024 : भारतीय संघात ‘या’ पाच खेळाडूंची नावं निश्चित? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -