T20 World Cup 2022: श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये सामन्याचा थरार, संघात ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात आज सामन्याचा थरार रंगताना पाहायला मिळत आहे. दोन्ही संघामध्ये नाणेफेक उडवली असता न्यूझीलंड संघाने प्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना पार पडत आहे.

दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्त्वपुर्ण ठरणार आहे. कारण सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना आजचा सामना जिंकावा लागणार आहे. न्यूझीलंडचा संघ ३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर, दोन गुणांसह श्रीलंकेचा संघ ५ व्या स्थानावर आहे.

संघात या खेळाडूंना मिळाली संधी –

न्यूझीलंड संघ –

फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

श्रीलंका संघ –

पथुम निसानका, कुसल मेंडिस, धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्तान), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थीक्षाना, लाहिरु कुमारा, कसुन रजिथा

दिवसभर पडत राहिलेल्या पावसामुळं मैदान खेळण्याजोगं न राहिल्यानं काल शुक्रवारी खेळले जाणारे दोन्ही सामने एकही चेंडू न खेळवता रद्द करण्यात आले. पावसामुळे आतापर्यंत चार सामन्यांचा निकाल लागलेला नाहीये. मात्र, यापुढंही पाऊस अनेक सामन्यात हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा : ‘या’ खेळाडूसाठी गाढवाला बाप म्हणावं लागलं, तर मी तेही करेन; ‘पाक’च्या पराभवावर वसीम अक्रम संतापला