घरक्रीडापाकिस्तानची 'ही' एक चूक अन् भारताला मिळाला 'विराट' विजय

पाकिस्तानची ‘ही’ एक चूक अन् भारताला मिळाला ‘विराट’ विजय

Subscribe

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.

रविवार 23 ऑक्टोबर रोजी टी – 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. भारत पाकिस्तान हा सामना चांगलाच रंगतदार झाला. पण भारताच्या दमदार खेळीपुढे पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले. 160 धावांचे लक्ष गाठताना भारतीय संघाने 31 धावांत चार विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर धावगतीही सातत्याने वाढत होती. शेवटच्या तीन षटकांपर्यंत भारताला विजय अवघड वाटत होता कारण त्यांना प्रत्येक षटकात 16 धावा करायच्या होत्या. पण अशातच भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.

सातव्या षटकात 31 धावांत चार विकेट गमावल्यानंतर भारतासाठी पुनरागमन करणे कठीण होते. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज दमदार खेळी करत होते आणि त्यांना सलग गोलंदाजी करण्याची संधी दिली असती तर भारताचे संकट मोठे होऊ शकले असते. पाकिस्तानकडे फक्त तीन वेगवान गोलंदाज होते आणि बाबर आझमने षटकाच्या शेवटपर्यंत त्यांना वाचवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

शेवटच्या षटकात नवाजने निर्णायक क्षणी नो बॉल टाकला.

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावांची गरज होती आणि मोहम्मद नवाजनेही पहिल्या तीन चेंडूत केवळ तीन धावा देत हार्दिक पांड्याची विकेट घेतली. तीन चेंडूत 13 धावा करणे खूप अवघड होते, पण नवाजने नो बॉल टाकला, त्यावर कोहलीने षटकार ठोकला. यानंतर फ्री हिटवर तीन धावा आल्या आणि भारताने सामना जिंकला.

- Advertisement -

विराटने पाकिस्तानी गोलंदाजांना धूळ चारली

17 व्या षटकाच्या अखेरीस, कोहलीने 42 चेंडूत 46 धावा केल्या होत्या आणि तो संथ फलंदाजी करत होता, पुढच्याच षटकात कोहलीने शाहीन आफ्रिदीला तीन चौकार ठोकले. कोहलीने 19व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले आणि शेवटच्या षटकासाठी फक्त 16 धावा शिल्लक होत्या. शेवटच्या षटकात कोहलीने महत्त्वपूर्ण षटकार मारला. विराट कोहलीने 53 चेंडूत 82 धावा करून नाबाद राहिला भारताला विजय मिळवून गेट दिवाळीचा आनंदही द्विगुणित केला.


हे ही वाचा – भारताच्या विजयानंतर गावसकरांचा आनंद गगनात मावेना, उड्या मारलेल्याचा व्हिडीओ व्हायरल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -