Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा नटराजनवर यशस्वी शस्त्रक्रिया; बीसीसीआय, चाहत्यांचे मानले आभार 

नटराजनवर यशस्वी शस्त्रक्रिया; बीसीसीआय, चाहत्यांचे मानले आभार 

नटराजन यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ दोन सामने खेळू शकला.

Related Story

- Advertisement -

सनरायजर्स हैदराबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला काही दिवसांपूर्वी यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले होते. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतला होता. मंगळवारी (आज) त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. याबाबतची माहिती त्याने स्वतःच्या ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘आज माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. मेडिकल टीम, सर्जन, डॉक्टर्स, नर्सेस यांनी माझ्यावर लक्ष दिले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. तसेच मी बीसीसीआय आणि मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो,’ असे नटराजन त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. ३० वर्षीय नटराजन यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ दोन सामने खेळू शकला.

काही दिवसांपूर्वी आयपीएल स्पर्धेतून माघार

नटराजनची यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. या दौऱ्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यातून तो पूर्णपणे सावरू शकला नव्हता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याला आयपीएल स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले होते. ‘मला उर्वरित मोसमात खेळता येणार नसल्याचे दुःख आहे. यंदा मला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, आता माझ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने मला उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे,’ असे त्यावेळी नटराजन म्हणाला होता.

- Advertisement -