घरक्रीडाT-20 : रनमशीन कोहलीचा 12000 धावांचा टप्पा अखेर पूर्ण

T-20 : रनमशीन कोहलीचा 12000 धावांचा टप्पा अखेर पूर्ण

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीग आयपीएलच्या 17 व्या पर्वातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू आहे. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. विशेष म्हणजे या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा आणि बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या टी-20 फॉरमॅटमधील 12000 धावांचा टप्पा पूर्ण झाला आहे.

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीग आयपीएलच्या 17 व्या पर्वातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सुरू आहे. या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. विशेष म्हणजे या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा आणि बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या टी-20 फॉरमॅटमधील 12000 धावांचा टप्पा पूर्ण झाला आहे. तसेच, टी-20मध्ये 12 हजार धावा करणारा विराट कोहली पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. सध्यस्थितीत चेन्नईचा संघ फलंदाजी करत असून कर्णधार ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला आहे. (t20 virat kohli complete 12000 runs in t20 cricket history ipl 2024 record first indian)

रनमशीन विराट कोहली जवळपास दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या पीचवर परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून सलामीसाठी आला असता 6 धावा काढत विराटने आपल्या 12 हजार धावांचा टप्पा पार केला. तसेच, विराट कोहलीनं आज चेन्नईविरुद्ध 15 धावा केल्यानंतर त्याच्या चेन्नईविरुद्ध 1 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. एखाद्या संघाविरुद्ध 1 हजार धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.

- Advertisement -

याशिवाय, आजच्या सामन्यात विराटने तीन विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहलीच्या टी-20 क्रिकेटची आजची 377 वी टी-20 मॅच आहे. याआधी खेळलेल्या टी-20 सामन्यांमध्ये (376) एकूण 11994 धावा केल्या होत्या. विराट कोहलीची टी-20 मधील सर्वाधिक धावसंख्या 122 आहे. विराटने 133.42 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर 8 शतकं असून त्यानं 91 अर्धशतकं लगावली आहेत.

विराटने 117 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 138.16 च्या स्ट्राइक रेटनं 4037 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका शतकाची नोंद असून त्यानं 37 अर्धशतकं आहेत.

- Advertisement -

आयपीएलमध्ये विराट कोहलीनं 237 सामने खेळले आहेत. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये 7263 धावा आहेत. विराटची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 113 इतकी आहे. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये 7 शतकांची नोंद असून 50 अर्धशतकं त्यानं लगावली आहेत.


हेही वाचा – IPL 2024 Opening Ceremony : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘नव्या भारता’ची छाप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -