टी ट्वेंटी विश्वचषकात महामुकाबला होणार आहे, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आज संध्याकाळी आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघातील चाहत्यांसह क्रिकेट वर्तुळात या सामन्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, पाकिस्तानच्या संघावर सामन्याचा दबाव जास्त आहे. ह्याच कारणाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे (PCB) कर्णधार बाबर आझमची सराव करतानाची व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
बाबर आझमने ट्वीट केलेल्या व्हिडिओवर अनेक पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, एका फॅन्सने आपली प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी संघाची चांगलीच खिल्ली उडवली. पाकिस्तानी संघ सतत भारतासमोर चितपट होत आला असून पाकिस्तानने एकदाही विश्वचषकात भारताचा पराभव केला नाही. त्याने असे म्हटले आहे की, “जेव्हा पासून जिंकण्याची अपेक्षा ठेवली आहे तेव्हापासून तुम्हाला सतत पराभूत होताना बघतोय” त्यामुळे या सामन्यात तरी जिंका असा त्याच्या बोलण्याच्या उद्देश असावा.
Bhaiyo kal jeet jana Allah da wasta hai jab say hosh sambhalay hain tum logo ko harta hi dekha hai 🙂
— Emaan (@abayysaalay) October 23, 2021
नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे (PCB) कर्णधार बाबर आझमची सराव करतानाची व्हिडिओ व्हायरल करण्यात आली आहे. त्या व्हिडिओला अनुसरून पीसीबीने बाबर आझमला किंग म्हणून संबोधले आहे, त्याच्या नंतर सोशल मिडियावर त्या ट्विटची सर्वत्र खिल्ली उडवण्यात आली. काही पाकिस्तानी फॅन्सनी बाबरला स्वस्तातला किंग देखील संबोधले आहे. तर काहींनी सांगितलं बाबरला कोणत्या तरी दुसऱ्या नावाने बोला कारण किंग तर फक्त कोहलीच आहे.
पाकिस्तानचा सामना आज भारतासोबत होणार आहे, साहजिकच पाकिस्तानसाठी सामन्यावर विजय मिळणे आव्हानात्मक असणार आहे, लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत कधीच पाकिस्तान कडून पराभूत झाला नाही. हाच विक्रम कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल, तर बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ आपल्या पराभवाच्या इतिहासाला मोडित काढण्यासाठी मैदानात उतरेल.
हेही वाचा : T20 WC pak vs ind : पाकिस्तानी तरूणीची धोनीकडे अजब मागणी….