घरक्रीडाT20 WC : T20 अपयशी ठरलेल्या टीम इंडियात फूट असल्याचा शोएब अख्तरचा...

T20 WC : T20 अपयशी ठरलेल्या टीम इंडियात फूट असल्याचा शोएब अख्तरचा मोठा दावा

Subscribe

भारतीय क्रिकेट संघातील एक भाग विराट कोहलीसोबत आहे आणि दुसरा त्याच्या विरोधात

टी-20 विश्वचषकात यंदा भारतीय क्रिकेट संघाचा सतत पराभव होत आहे. ह्यावेळेस सलग दुसऱ्यांदा भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झाला असून, सोशल मिडियावर ट्रोलिंगला सुरुवात झाली आहे.पाकिस्तानने १० विकेट्सने तर न्यूझीलंडने ८ विकेट्सने मात दिली आहे. दरम्यान यंदाच्या टी २० विश्वचषकात पाकिस्तानी संघ आपल्या शानदार कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आहे. सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेट संघावर टीका होत असताना, पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानेही भारतीय क्रिकेटपटूंवर खोचक टीका करत अपयशी ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघात फूट असल्याचा दावा केला आहे. शोएब अख्तरचा असे म्हणणे आहे की, भारतीय क्रिकेट संघामध्ये फूट पडली असून, भारतीय क्रिकेट संघातील एक भाग विराट कोहलीसोबत आहे आणि दुसरा त्याच्या विरोधात आहे. बायो बबलमध्ये दीर्घकाळ राहणे, खराब संघ निवड आणि खराब रणनीती यामुळे टीम इंडियाची ही अवस्था झाल्याचे क्रिकेट विश्लेषकांचे मत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

- Advertisement -

यंदाच्या टी २० विश्वचषकात पाकिस्तानी संघ आपल्या शानदार कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानी संघाने आपल्या पहिल्या दोन सामन्यात खेळी केली, त्यामुळे पाकिस्तानी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बाबर आझमच्या संघाने भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात पराभव करून विश्वचषकातील एक मोठा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानने विश्वचषकाच्या स्पर्धेत भारताचा पहिल्यांदाच पराभव केला. टीम इंडियाच्या सततच्या पराभवानंतर शोएबने नाराजी व्यक्त करत भारतीय खेळाडूंना ‘तुम्हाला मैदानावर क्रिकेट खेळायचं आहे की इन्स्टाग्रामवर?’ असा खोचक सवालही विचारला होता.

 

- Advertisement -

हे ही वाचा – Yuvraj singh: मी परत येतोय ! सिक्सर किंग युवराज सिंगची घोषणा


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -