T20 WC : भारत-पाकिस्तान टी२० वर्ल्ड कपचा निकाल सर्वांना आधीच माहितेय – वीरेंद्र सेहवाग

T20 WC virender sehwag statement on india pakistan world cup match
T20 WC : भारत-पाकिस्तान टी२० वर्ल्ड कपचा निकाल सर्वांना आधीच माहितेय - वीरेंद्र सेहवाग

टी२० वर्ल्डकप सुरु होण्याची वाट पाहत असताना प्रत्येकाचे लक्ष २४ ऑक्टोबर रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तानच्या सामन्यावर आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करु शकला नाही. मग ते ५० षटकांचा सामना असो किंवा २० षटकांचा सामना असोत. भारतीय क्रिकेट संघ आपल्या रिकॉर्ड १३-० अशा फरकाचा करण्यासाठी खेळेल. भारत-पाकिस्तानमध्ये रविवारी सामना होणार आहे. यापुर्वीच भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे की, जेव्हा हे दोन संघ आमने-सामने असतात तेव्हा त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा, शाब्दिक वाद होत असतात.

विरेंद्र सेहवाग म्हणाला आपण मागील अनेक वर्षांपासून एकच गोष्ट ऐकतो आहोत. तसेच हा मोठा खेळ असून विषयही नेहमी चर्चेत राहिला आहे की, पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये भारताविरु्ध एकदाही विजय मिळवला नाही. आताही पाकिस्तान जिंकणार यावरुन वाद सुरु आहे. परंतु जर आपण परिस्थिती आणि आकडेवारी पाहिली तर मला असं वाटत की, पाकिस्तान या खेळात ५० षटकांच्या सामन्यात अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी असते परंतु ते चांगले खेळत नाहीत. या सामन्याच्या प्रकारात एक खेळाडू कोणत्याही टीमला पराभूत करु शकत नाही. मात्र पाकिस्तानचा संघ असे करु शकला नाही. आता २४ ऑक्टोबरला काय होणार ते पाहू असे विरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

१९९२ नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये १२ वेळा वर्ल्ड कपचा सामना झाला आहे. यामध्ये भारत वनडेमध्ये ७-० आणि टी२० मध्ये ५-० अशा फरकाने जिंकला आहे. पाकिस्तान आतापर्यंत भारताला मोठ्या सामन्यात पराभूत करु शकला नाही कारण भारताने नेहमी दबावाला सांभाळण्याचे काम केले असल्याचे विरेंद्र सेहवागने सांगितले. आम्ही कधी मोठे-मोठे वक्तव्य करत नाही. याविरुद्ध पाकिस्तानकडून नेहमी मोठे मोठे विधाने केली जातात. भारत कधीही असे वक्तव्य करत नाही कारण संघाची तयारी उत्तम असते. जर तुम्ही चांगल्या तयारीने उतरता तर तुम्हाला माहिती असते की याचा निकाल काय असणार असे विरेंद्र सेहवाग म्हणाला.


हेही वाचा : न्यूझीलंड दौऱ्यात रुम नसल्याने धोनी माझ्यासाठी जमिनीवर झोपला; मुलाखतीत पांड्याने सांगितली इनसाईड स्टोरी