घरक्रीडाT20 world cup 2021: AUS VS PAK पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला दिले १७७...

T20 world cup 2021: AUS VS PAK पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला दिले १७७ धावांचे लक्ष्य

Subscribe

टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य दिले.

सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांच्या अचूक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला १७७ धावांचे लक्ष्य दिले आहे. पाकिस्तानने २० षटकांत ४ बाद १७६ धावा केल्या.

सलामीवीर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने सुरुवातीपासून सावध खेळी करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. कर्णधार बाबर ३९ धावांची छोटी पारी खेळून बाद झाला. संघाकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ५२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही षटकांत फखर जमानने मोठे फटकार मारून ३२ चेंडूत ५५ धावांची अर्धशतकीय खेळी करून संघाला एका मजबूत धावसंख्येपर्यंत पोहचवले.

- Advertisement -

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पहिल्या १० षटकांत डावावर पकड बनवण्यात यशस्वी झाले. मात्र फखर जमानने शेवटच्या काही षटकांत शानदार खेळी करून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चितपट केले. ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक २ बळी घेतले. तर कमिंग्स आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

आजच्या सामन्यात विजय मिळवेल त्या संघाला आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. सोबतच आजचा विजयी संघ रविवारी १४ नोव्हेंबरला न्यूझीलंडसोबत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळेल. पाकिस्तान एकमेव असा संघ आहे ज्या संघाने चालू विश्वचषकात एकही पराभवाचा सामना केला नाही.

- Advertisement -

हे ही वाचा: Badminton : देशांतर्गत बॅडमिंटन हंगाम दोन दशकानंतर होणार सुरूवा


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -