घरक्रीडाT20 world cup 2021 : अफगाणिस्तानने दिले स्कॉटलँडला १९१ धावांचे आव्हान

T20 world cup 2021 : अफगाणिस्तानने दिले स्कॉटलँडला १९१ धावांचे आव्हान

Subscribe

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला १९१ धावांचे मोठे आव्हान दिले आहे

टी२० विश्वचषकामध्ये अफगाणिस्तान आणि स्कॉटलँडमधील सामना फारच रंगत ठरत आहे, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत स्कॉटलँडला १९१ धावांचे तगडे आव्हान दिले आहे. नजीबुल्लाह जादरानच्या अर्धशतकीय खेळीमुळे अफगाणिस्तानला ही धावसंख्या गाठता आली, त्याच्यापाठोपाठ रहमुनुल्लाह गुरबाज ने ४६ तर हजरतुल्लाह जजईने ४४ धावा जोडल्या. टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला तगडे आव्हान दिले आहे.

हजरतुल्लाहचे अर्धशतक हुकले

हजरतुल्लाह जजईचे अर्धशतक ६ धावांसाठी हुकले, मार्क वाटने हजरतुल्लाह जजईला ४४ धावांवर बाद केले. जजईने ३० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ही धावसंख्या उभारली होती. अफगाणिस्तानचा दुसरा फलंदाज १० व्या षटकाराच्या ५ व्या चेंडूवर बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या ८२ होती. सलामीवीर मोहम्मद शहजादच्या रूपात अफगाणिस्तानला पहिला झटका बसला, ६ व्या षटकारातील ५ व्या चेंडूवर सुफियान शरीफने शहजादचा बळी घेतला. शहजादने १५ चेंडूत २२ धावा बनवून संघाला चांगली सुरूवात करून दिली. शहजाद बाद झाला तेव्हा अफगाणिस्तानची धावसंख्या ५४ एवढी होती.

- Advertisement -

अफगाणिस्तानची जमेची बाजू

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला १९१ धावांचे मोठे आव्हान दिले आहे, साहजिकच हे लक्ष गाठणे प्रतिस्पर्धी संघाला कठीण आहे. अफगाणिस्तानची गोलंदाजी संघासाठी जमेची बाजू असणार आहे, फिरकीपट्टू राशिद खान, मोहम्मद नबी यांच्या फिरकी समोर मोठे शॉर्ट्स मारणे नक्कीच मोठे आव्हान असणार आहे, स्कॉटलँडच्या तुलनेत अफगाणिस्तानचा संघ अनुभवी आहे. संघात मुजीब उर रहिमान आणि नवीन उल हक यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत. साहजिकच सामन्यावर अफगाणिस्तानचे वर्चस्व जास्त असण्याची शक्यता आहे.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -