घरक्रीडाT20 world cup 2021: मॉर्गन बनला टी २० आंतरराष्ट्रीय मधील सर्वात यशस्वी...

T20 world cup 2021: मॉर्गन बनला टी २० आंतरराष्ट्रीय मधील सर्वात यशस्वी कर्णधार; धोनी, असगरला टाकले मागे

Subscribe

इऑन मॉर्गनने त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरूध्दचा सामना जिंकून एका नव्या विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे

२०२१ च्या चालू टी २० विश्वचषकात इग्लंडच्या संघाकडून शानदार खेळी केली जात आहे. सोमवारी झालेल्या श्रीलंकेविरूध्दच्या सामन्यात मॉर्गनच्या संघाने २६ धावांनी सामना जिंकून स्पर्धेत विजयी चौकार मारला आहे. या विजयासोबतच इग्लंडने आपल्या उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित केले. इऑन मॉर्गनने त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरूध्दचा सामना जिंकून एका नव्या विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. मॉर्गन आता टी २० आंतरराष्ट्रीय मधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याने याबाबतीत भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनी आणि अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानला मागे टाकत या विश्वविक्रमाची कमाई केली आहे.

इऑन मॉर्गनच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात इग्लंडच्या संघाने ६८ सामन्यांत ४३ सामने जिंकले आहेत. यात दोन सुपर ओव्हर सामन्यांतील विजयाचा देखील समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वीच टी २० ला राम राम करणारा अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानने एकूण ५२ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. त्यात त्याच्या नेतृत्वात संघाला ४२ सामन्यात विजय मिळाला होता. तर भारताचा महान खेळाडू आणि सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ज्याची ओळख आहे त्या धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने एकूण ७२ टी २० सामने खेळले आहेत. त्यात भारतीय संघाला ४२ सामन्यात विजय मिळाला होता.

- Advertisement -

कर्णधार पदाच्या नेतृत्वात पुढील काही सामन्यांत मॉर्गन धोनीचा अजून एक विक्रम मोडू शकतो. मॉर्गनने आतापर्यंत ६८ टी २० सामन्यांत इग्लंडच्या संघाचे नेतृत्व केले आहे. तर धोनीने ७२ सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. म्हणजेच आणखी ४ सामने खेळून मॉर्गन धोनीचा हा देखील विक्रम मोडीत काढू शकतो सोबतच मॉर्गन मधल्या फळीच्या फलंदाजांमध्ये इग्लंडकडून सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज ठरला आहे.

इऑन मॉर्गनने आतापर्यंत इग्लंडच्या संघासोबत खेळताना २२३ एकदिवसीय सामन्यात ४०.२१ च्या औसतनुसार ६९५७ धावा केल्या आहेत. त्यात १३ शतके आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने १११ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २४०७ धावा बनवल्या आहेत. त्यात १४ अर्धशतकीय खेळींचा समावेश आहे.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -