घरक्रीडाT20 WC Final 2021 AUS vs NZ : कर्णधार विलियमसनची शानदार खेळी;...

T20 WC Final 2021 AUS vs NZ : कर्णधार विलियमसनची शानदार खेळी; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान

Subscribe

आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले

कर्णधार विलियमसनच्या शानदार खेळीच्या बदल्यात न्यूझीलंडने टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान दिले आहे. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमसनने सर्वाधिक ८५ धावांच्या केल्या. बदल्यात न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून कर्णधार विलियमसन वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. मार्टिन गुप्टिलने (२८), ग्लेन फिलिप्स (१८), तर जेम्स नीशमने नाबाद १३ धावा करून संघाला एका अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात हातभार लावला.

तत्पुर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. डावाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाकडून सावध गोलंदाजी झाली. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि डॅरिल मिशेलला स्वस्तात माघारी पाठवण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश आले. न्यूझीलंडकडून जोश हेझलवुडने सर्वाधिक ३ बळी घेत न्यूझीलंडच्या संघावर दबाव राखून ठेवला. तर अॅडम झाम्पाला १ बळी पटकावण्यात यश आले. मात्र ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळी करून न्यूझीलंडच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. मिचेल स्टार्कला एकही बळी पटकावण्यात यश आले नाही. स्टार्कच्या ४ षटकांत ६० धावा काढून न्यूझीलंडच्या फलंदाजांनी स्टार्कच्या आक्रमक माऱ्याला अयशस्वी ठरवले.

- Advertisement -

दोन्हीही संघाकडे आपला पहिला टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी असणार आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ जगासमोर एक नवा चॅम्पियन म्हणून समोर येईल. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार अॅरोन फिंचला रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.


हे ही वाचा :http://अजिंक्य रहाणेला कर्णधार केल्याने भडकला हा दिग्गज खेळाडू; BCCI ला विचारला प्रश्न

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -