घरक्रीडाVideo: Aus vs Pak दोन टप्प्यावर वॉर्नरच्या सिक्सरवर गौतम गंभीर भडकला, म्हणाला...

Video: Aus vs Pak दोन टप्प्यावर वॉर्नरच्या सिक्सरवर गौतम गंभीर भडकला, म्हणाला…

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने वॉर्नरच्या खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत

टी-२० विश्वचषकात गुरूवारी झालेल्या पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार खेळी करून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. तर आता १४ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये फायनलचा सामना होणार आहे. असातच गुरूवारच्या सामन्यादरम्यान डेविड वॉर्नरने मारलेल्या एका षटकाराची सर्वत्र चर्चा होत आहे. वॉर्नरने मोहम्मद हफिजने टाकलेल्या २ टप्प्यांच्या चेंडूवर षटकार मारला होता. याची क्रिकेट वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर यावरून आता भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने वॉर्नरच्या खेळाच्या भावनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या पारीचे ८ वे षटक चालू होते. त्या षटकातील पहिलाच चेंडू हफिजच्या हातातून घसरला आणि २ टप्पे पडून फलंदाज वॉर्नरपर्यंत पोहचला. वॉर्नरने दोन पाउले पुढे येत या चेंडूवर षटकार मारला. नियमानुसार हा बाद चेंडू होता आणि पंचानीसुध्दा हा बाद चेंडू म्हणून घोषित केला होता. पण वॉर्नरने या चेंडूवर षटकार मारल्याने गंभीरने त्यावर हे खेळ भावनेच्या विरूध्द असल्याचे म्हटले.

- Advertisement -

गंभीरने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “वॉर्नरकडून खेळ भावनेचे अतिशय वाईट प्रदर्शन झाले आहे. हे लज्जास्पद आहे. रवीचंद्रन अश्विन आपण काय सांगाल?. तर गंभीरने अश्विनला टॅग करत यावर प्रश्न देखील विचारला. अश्विनला प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे आयपीएल २०१९ मध्ये अश्विनने जोस बटलरला मांकडिग करत बाद केले होते. त्याच्यावर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू पॉटींग आणि शेन वॉर्न यांनी अश्विनच्या खेळ भावनेवर प्रश्न उपस्थित केले होते.

- Advertisement -

तर गुरूवारच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला १७७ धावांचे आव्हान दिले होते. सलामीवीर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात १७७ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकांत १७७ धावा करून विजय मिळवला. डेविड वॉर्नरने ४९ धावा केल्या. तर मॅथ्यू वेड ४१, आणि स्टोइनिस ४०, यांनी नाबाद खेळी करून ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.

Video – दोन टप्पा बॉलवर सिक्सर


हे ही वाचा: IND VS NZ : कसोटी मालिकेत बड्या खेळाडूंना विश्रांती, मुंबईकराकडे भारतीय संघाचे नेृतृत्व


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -