घरक्रीडाInd vs Pak : भारत वि. पाकिस्तान सामना ठरला सर्वाधिक लोकप्रिय; विश्वचषकातील...

Ind vs Pak : भारत वि. पाकिस्तान सामना ठरला सर्वाधिक लोकप्रिय; विश्वचषकातील सामन्याचा नवा विक्रम

Subscribe

टी-२० विशचषकात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्याने लोकप्रियतेत नवा विक्रम केला आहे.

भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटलं की सर्वत्र चर्चा, उत्साह आणि क्रिकेटमय वातावरण पहायला मिळते. इतिहासात कित्येकदा भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान मैदाने तुंडूब भरलेली निदर्शनास आली आहेत. सोबतच या दोन्हीही संघाच्या सामन्याच्या जगभर चर्चा होत असतात. अशाच एका भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याने लोकप्रियतेत नवा विक्रम केला आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते. त्या पाकिस्तानने भारताचा दारूण पराभव केला होता. मात्र त्या सामन्यादरम्यान जवळपास दहा हजार तासांचे लाईव्ह कव्हरेज केले गेले होते. पूर्वीपेक्षा जास्त भारत, पाकिस्तान, यूके, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशांमध्ये हा सामना पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

दर्शकसंख्या आणि त्या साइट वापराच्या पार्श्वभूमीवर २०० देशांमध्ये टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर या सामन्याचे ऑफर केले जाते. एक प्रेस हँडआउटने जारी केलेल्या माहितीनुसार आयसीसीने याबाबत सांगितले आहे. जगभरातील क्रिकेट आणि क्रीडा चाहत्यांनी आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२१ च्या मोठ्या कव्हरेजचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला. मात्र जेव्हा ही स्पर्धा पाच वर्षांनी परतली तेव्हा खेळाच्या सर्वात लहान स्वरूपाच्या घटकाच्या अनेक लाईव्ह कव्हरेज देणाऱ्या घटकांनी प्रत्येकासाठी क्रिकेट आणि मनोरंजनाची ऑफर दिली. सोबतच क्रिकेटची सर्वात मोठी नावे आणि सर्वोत्तम संघ सर्व जगासमोर आणली.

- Advertisement -

यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्यात येणारी आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून टी-२० विश्वचषकाचा उल्लेख केला जातो. या स्पर्धेच्या प्रशेक्षपणादरम्यान स्टार इंडिया नेटवर्कने १६७ दशलक्ष टेलिव्हिजनच्या विक्रमी आकड्यापर्यंत मजल मारली. तर भारतात यादरम्यान १५.९ अब्ज मिनिटांचा विक्रमी वापर झाला यासह अनेक क्षेत्रांमध्ये दर्शकांचे हा सामना पाहण्याचा विक्रम मोडला. विश्वचषकात झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना आताच्या घडीला इतिहासातील सर्वात जास्त पाहिला जाणारा टी-२० सामना बनला आहे. त्या सामन्याने २०१६ मध्ये झालेल्या भारत आणि वेस्टइंडीजच्या उपांत्य फेरीतील सामन्याचा विक्रम मोडला आहे. सोबतच भारतात झालेल्या आयसीसी स्पर्धेतील विक्रमाला मागे टाकले आहे.


हे ही वाचा: Cricket Australia : तब्बल ६५ वर्षानंतर वेगवान गोलंदाज कर्णधारपदी, ऑस्ट्रेलियाचा नवा कसोटी कर्णधार घोषित

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -