घरक्रीडाT20 world cup 2021: खेळाडू म्हणजे रोबोट नाही, पीटरसनने भारतीय खेळाडूंना दिला...

T20 world cup 2021: खेळाडू म्हणजे रोबोट नाही, पीटरसनने भारतीय खेळाडूंना दिला आधार; हिंदीत ट्विट करत म्हणाला….

Subscribe

केविन पीटरसनने हिंदीत ट्विट करून भारतीय खेळाडूंचे आणि चाहत्यांचे मनोबल वाढवले आहे

टी २० विश्वचषक २०२१ च्या स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक पहायला मिळाली. भारताला दोन्ही सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने १० गडी राखून तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ८ गडी राखून भारतीय संघाला धूळ चारली. साहजिकच सलगच्या २ मोठ्या पराभवामुळे भारतीय चाहत्यांच्या मनात मोठी नाराजी पसरली आहे. अशातच भारतीय खेळाडूंना भावनिक आधार देण्यासाठी इग्लंडचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज केविन पीटरसन धावून आला आहे. त्याने हिंदीत ट्विट करून भारतीय खेळाडूंचे आणि चाहत्यांचे मनोबल वाढवले आहे.

माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “खेळात एक विजयी तर एक पराभूत होत असतो. कोणताच खेळाडू पराभवासाठी बाहेर येत नसतो, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सर्वात मोठा सम्मान असतो. कृपया लक्षात घ्या खेळणारे खेळाडू रोबोट नाहीत. आणि त्यांना प्रत्येक क्षणी आपल्या समर्थनाची आवश्यकता असते. अशा शब्दांत पीटरसनने भारतीय खेळाडूंना आधार देत चाहत्यांना खेळ भावना जपण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

रविवारी झालेल्या भारत विरूध्द न्यूझीलंडच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद केवळल ११० धावा उभारल्या. दुसऱ्या डावात ११० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने २ गड्यांच्या मोबदल्यात ८ गडी राखून मोठा विजय मिळवला.

- Advertisement -

दरम्यान केविन पीटरसनने हिंदीमध्ये ट्विट केल्यावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने यापूर्वीही अनेकदा हिंदीत ट्विट केले आहेत. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिम्मित देखील त्याने हिंदीत ट्विट करून भारतीयांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात त्याने चालू वर्षी घडलेल्या भाविनक घटनांवर भाष्य करत आपण यातून पुन्हा पूर्वपदावर येऊ असे म्हटले होते. तर मी आपणांस भेटण्यासाठी आतुर असल्याचे त्याने सांगितले होते.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -