घरक्रीडाT20 world cup 2021: "सोशल मीडियाला कोणीही रोखू शकत नाही; शोएब अख्तरचा...

T20 world cup 2021: “सोशल मीडियाला कोणीही रोखू शकत नाही; शोएब अख्तरचा न्यूझीलंडला इशारा

Subscribe

जर न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान सोबतच्या सामन्यात पराभूत झाला तर खूप चर्चा रंगेल. अशा स्थितीत सोशल मीडियाला रोखणार कोणी असू शकत नाही असे शोएब अख्तरने एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितले

टी-२० विश्वचषकातील न्यूझीलंड आपला शेवटचा सामना अफगाणिस्तानविरूध्द खेळणार आहे. रविवारी अबु धाबीच्या शेख जायद मैदानावर होणाऱ्या या सामन्याकडे भारतीय चाहत्यांचे सर्वात जास्त लक्ष असणार आहे. अफगाणिस्तानचा संघ जर या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाला, तर भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा वाढणार आहेत. पण जर न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला तर भारतीय संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे आव्हान तिथेच संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या सामन्यावर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवास अवलंबून आहे. यातच या सामन्यावर भारताच्या शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची पण नजर लागून राहिली आहे. यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

अख्तरने सांगितले की, जर न्यूझीलंडचा संघ या सामन्यात पराभूत झाला तर खूप चर्चा रंगेल. अशा स्थितीत सोशल मीडियाला रोखणार कोणी असू शकत नाही. शोएब अख्तरने एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितले, “जर काही चमत्काराने न्यूझीलंड या सामन्यात पराभूत झाले तर खूप सारे प्रश्न समोर येतील. हे मी आपल्याला पहिलेच सांगतो आहे. तसेच मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही. पण पाकिस्तानी लोकांच्या मनात न्यूझीलंडबद्दल खूप भावना आहेत.

- Advertisement -

अख्तरने आणखी सांगितले की, “न्यूझीलंड एक चांगला संघ आहे आणि तो अफगाणिस्तानचा पराभव करू शकतो. पण जर संघाकडून खराब कामगिरी झाली तर ही मोठी समस्या बनू शकते. तर सोशल मीडियाला कोणीही रोखू शकत नाही. यावर कोणी काहीच करू शकत नाही. भारताच्या सलग २ विजयामुळे विश्वचषकात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. कदाचित पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचा सामना होऊ शकतो. तो सामना पाहण्यासाठी पूर्ण जग उत्सुक आहे.

मी पण भारत आणि पाकिस्तानचा फाइनलचा सामना बघण्यासाठी उत्सुक आहे. हे दोन्ही संघातील युवा खेळाडूंसाठी चांगले असेल. जर भारतीय संघ विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर झाला तर दोन्ही संघातील खेळाडूंसाठी निराशाजनक बाब असेल. भारतीय संघ चांगला खेळला पण थोडा उशीर झाला आहे. बघूया पुढे काय होते ते असे अख्तरने आणखी बोलताना सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – T20 world cup 2021: भारताच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल; सेमी फायनलचे नवे समीकरण काय?

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -