T20 world cup 2021 : NZ vs Aus कोण लिफ्ट करणार यंदाचा टी २० विश्वचषक? उद्या चुरशीची लढत

T20 world cup 2021 NZ vs Aus Australia and New Zealand Road To Final
T20 world cup 2021 : NZ vs Aus कोण लिफ्ट करणार यंदाचा टी २० विश्वचषक? उद्या चुरशीची लढत

टी २० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पार पडेल. यंदाच्या विश्वचषकात न्यूझीलंडच्या संघाला पहिला वहिला असा विश्वचषक लिफ्ट करण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियन टीमचा सध्याचा फॉर्म पाहता हा संघही चषक आपल्याकडे घेण्याची संधी सोडणार नाही. रविवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता हा सामना होणार आहे. दोन्ही संघ अतिशय अटीतटीचे सामने जिंकत फायनल पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे क्रिकेट रसिकांना चुरशीची लढत पहायला मिळेल.

एकीकडे ऑस्ट्रेलियन ओपन वॉर्नरला गवसलेला फॉर्म तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने संपूर्ण मालिकेत दाख़वलेली चिकाटी ही दोन्ही संघातील सकारात्मक बाब आहे. पण दोन्ही संघांनी गेल्या काही दिवसांपासून केलेली तयारी पाहता दोन्ही संघातील खेळाडू विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची संधी सोडणार नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही संघांनी फारसे क्रिकेट खेळलेले नाही. त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे.

दोन्ही संघातील मॅच विनर ठरलेल्या खेळाडूंवरही अंतिम सामन्यात नजर असणार आहे. न्यूझीलंडच्या जेम्स निशम तर ऑस्ट्रेलियन मॕथ्यू वेडच्या कामगिरीकडे सगळ्यांच्या नजरा असतील. या सामन्यात ऑस्ट्रेलियन टीमचे पारडे जड आहे अशी चर्चा सुरू आहे. पण न्यूझीलंडचा संघही विजयाच्या मोहिमेवर आहे. इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात कर्णधार केन विल्यम्ससह अनेक खेळाडूंनी विजयाचे सेलिब्रेशन केले नव्हते. मॅच विनर ठरलेल्या खेळाडूंपैकी एक जेम्स निशम याने माझी मोहीम संपलेली नाही असे सांगत सेमी फायनलच्या विजयाचे सेलिब्रेशन केले नव्हते. त्यामुळे मोहिमेवर असणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला ही कमी लेखून चालणार नाही.


हेही वाचा : कोहलीचे कर्णधारपद, रवी शास्त्रींचा मोठा खुलासा, व्हाईट – रेड बॉलचे कर्णधारपद…