घरक्रीडाT20 world cup NZ VS NAM : न्यूझीलंडचा ५२ धावांनी विजय; नामिबियाचे...

T20 world cup NZ VS NAM : न्यूझीलंडचा ५२ धावांनी विजय; नामिबियाचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात

Subscribe

न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ मधील लढतीत नामिबियाचा ५२ धावा राखून पराभव केला

वेगवान गेलंदाज टिम साउदीची अचूक गोलंदाजी आणि ग्लेन फिलिप्सच्या ताबडतोब फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ मधील लढतीत नामिबियाचा ५२ धावा राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानला मागे टाकत ग्रुप बी च्या दुसऱ्या स्थानावर मजल मारली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सांघिक खेळीच्या जोरावर नामिबियाला १६४ धावांचे तगडे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या नामिबियाची सुरूवातीची फलंदाजी चांगली झाली. पण न्यूझीलंडने प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ४७ असताना प्रतिस्पर्धी संघाचा सलामीवीर लीगेंनला बाद करत पहिला झटका दिला. न्यूझीलंडच्या आक्रमक माऱ्याच्या बदल्यात नामिबियाचा संघ २० षटकांत ७ बाद केवळ १११ धावा बनवू शकला. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ट्रेंन्ट बोल्ट आणि टिम साउदीने प्रत्येकी २-२ बळी घेऊन सामन्यावर पकड मजबूत केली.

तत्पुर्वी, नामिबियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. नामिबियाच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय यशस्वी ठरवत पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघावर दबाव राखून ठेवण्यात यश मिळवले पण संघाला विजय मिळवून देण्यात त्यांची खेळी अपयशी ठरली. नामिबियाकडून मायकेल व्हॅन लिंगेनने सर्वाधिक २५ धावा केल्या तर संघातील कोणत्याच फलंदाजाला मोठी धावसंख्या करण्यात यश आले नाही. न्यूझीलंडकडून टिम साउदी आणि बोल्टने प्रत्येकी २-२ बळी घेतले तर मिचेल सँटनर, जेम्स नीशम आमि इश सोधीला प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

- Advertisement -

तर नामिबियाकडून बर्नार्ड शॉल्झ,डेविन वाइस आणि गेरहार्ड इरास्मस या गोलंदाजांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. या विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील आपले आव्हाम कायम ठेवले आहे. सोबतच नामिबियाचा स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -