T20 world Cup 2021 : इंग्लंडच्या टीमला मोठा झटका, अष्टपैलू खेळाडू सॅम करन टी२० वर्ल्ड कपमधून बाहेर

विश्वचषकातून बाहेर पडणे दुर्दैवी - सॅम करन

T20 world Cup 2021 : sam curran out of england team T20 WC due to injury
T20 world Cup 2021 : इंग्लंडच्या टीमला मोठा झटका, अष्टपैलू खेळाडू सॅम करन टी२० वर्ल्ड कपमधून बाहेर

इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टी२० वर्ल्ड कप २०२१ तोंडावर असताना संघातील अष्टपैलू खेळाडू सॅम करनला दुखापत झाली असल्यामुळे संघाचे प्रतिनिधित्व करु शकणार नाही. सॅम करण सध्या यूएईमध्ये आयपीएल २०२१ चेन्नई सुपर किंग्जमधून खेळत आहे. दुखापत झाल्यामुळे सीएसकेसाठी खेळू शकणार नाही. सॅम करन टी२० वर्ल्ड कप २०२१ साठी संघात खेळणार नसल्याची अधिकृत माहिती इंग्लंड एंड वेल्स क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

सॅम करनच्या जागी मुख्य १५ सदस्यांच्या संघात त्याचा भाऊ टाम करनचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वेगवान गोलंदाज रीस टापलेला आरक्षित खेळाडू म्हणून संघात संधी देण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, सॅम करन दुखापत झाली असल्यामुळे विश्रांती घेणार आहे. त्याच्या दुखापतीनुसार त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहे.

सॅम करनने शनिवारी अबू धाबीमध्ये राजस्थान रॉयल सोबत झालेल्या सामन्यादरम्यान कंबर दुखत असल्याचे सांगितले होते. यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि दुखापतीबाबद विस्तृत माहिती समोर आली आहे.

आयपीएलमध्ये सॅम करण चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत होते. या हंगामातील ९ सामन्यांदरम्यान एकूण ९ बाद केले आहेत तर ४ इनिंगमध्ये ५६ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ २०१० मधील टी२० वर्ल्ड कप विजयी केला आहे. इंग्लंडला १८ ऑक्टोबरला भारतासोबत रंगीत तालीम होणार आहे. इंग्लंडच्या संघाला मर्यादित षटकांच्या सामन्यात ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, साउथ अफ्रीका आणि वेस्टइंडीज संघासोबत ठेवले आहे. आयपीएलचा १४वा हंगाम १५ ऑक्टोबरला संपणार आहे. यानंतर लगेच १७ ऑक्टोबरपासून टी२० विश्वचषक सुरु होणार आहे.

विश्वचषकातून बाहेर पडणे दुर्दैवी – सॅम करन

अष्टपैलू खेळाडूला आपण आयपीएल आणि विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकाच्या स्पर्धेतून आणि आयपीएलमधून बाहेर पडणे दुर्दैवी असल्याचे सॅम करन यांनी म्हटलं आहे. तसेच सीएसकेच्या संघातून बाहेर पडलो असलो तरी संघ चांगली कामगिरी करत असताना जात आहे. संघाला जिथे असेल तिथून पाठिंबा देईल. सीएसके संघ नक्कीच विजेतेपद पटकावेल असा विश्वास देखील सॅम करन याने व्यक्त केला आहे.


हेही वाचा : IPL 2021: धोनीच्या फॉर्मवर CSK चे कोच म्हणतात…