घरक्रीडाभारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये सुपर 12 फेरीतला होणार महत्त्वाचा सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये सुपर 12 फेरीतला होणार महत्त्वाचा सामना

Subscribe

टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर भारताचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी उत्तम तयारी केल्याचे पाहायला मिळते आहे.

टी-20 विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर भारताचा तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी उत्तम तयारी केल्याचे पाहायला मिळते आहे. कारण उद्याचा सामना हा दोन्ही संघांसाठी सुपर 12 फेरीतला महत्वाचा असणार आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणता संघ विजय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (t20 world cup 2022 ind vs sa head to head stats and records)

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी मागील काही सामन्यात अटीतटीची लढत दिली आहे. दोन्ही संघांनी आपापल्या मागील सामन्यांमध्ये मोठे विजय नोंदवले आहेत. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात आले आहेत.

- Advertisement -

या 23 सामन्यांमध्ये भारतीय संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेने 9 सामन्यात बाजी मारली आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरला आहे. त्यामुळे सध्याची आकडेवारी लक्षात घेता भारतीय संघ उद्याच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर भारी पडण्याची शक्यता आहे. कारण टी-20 विश्वचषकापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्याची टी-20 मालिका जिंकली होती.

या टी-20 मालिकेनंतर पुन्हा एकदा भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात कोणता संघ विजय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -
  • भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर-12 मधील सामना रविवारी 30 ऑक्टोबर रोजी पर्थ क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल.
  • भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 4.30 वा. सुरू होईल.
  • अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल.
  • भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल.
  • या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहता येईल.

भारतीय संभाव्य संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ:
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रीसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी/लुंगी एनगिडी/मार्को जॅनसेन.


हेही वाचा – T20 World Cup : श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव करत न्यूझीलंड अ गटाच्या अव्वल स्थानी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -