भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? वाचा सविस्तर

टी-20 विश्वचषकातील भारताचा चौथा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. आजचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी गुणतालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची माहिती समोर येत आहे.

टी-20 विश्वचषकातील भारताचा चौथा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. आजचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांसाठी गुणतालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. दरम्यान, पावसाची शक्यता असल्याने सामन्याच्या नाणेफेकीलाही उशीर होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (t20 world cup 2022 India vs Bangladesh match rain predictions Adelaide weather forecast)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अ‍ॅडलेडमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सामना सुरू होणार आहे. मात्र या ठिकाणी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज ॲडलेडमध्ये पावसाची 61 टक्के शक्यता आहे. तसेच, ढगाळ वातावरणही शक्यता आहे.

पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर भारताला तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात गमवावा लागला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चांगली खेळी करत भारतावर विजय मिळवला. मात्र आजचा सामना दोन्ही संघांसाठी गुणतालिकेत आपले स्थान निश्चित कारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ॲडलेडमधील वातावरणाची माहिती

  • 61 टक्के पावसाची शक्यता
  • 91 टक्क्यांपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
  • कमाल तापमान 16 अंश सेल्सिअस राहील
  • किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता
  • वाऱ्याचा वेग 50 किमी प्रतितास असेल.

टी-20 विश्वचषकातील ब गटाच्या गुणतालिकेत भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ समान गुणांवर आहेत. भारताने आतापर्यंत 3 सामने खेळले असून यामधील 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचे 4 गुण झाले आहेत. तसेच, बांगलादेशनेही आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. यामध्ये बांगलादेशने 2 सामन्यात विजय मिळवल्याने त्यांची गुणसंख्या भारतासमानच आहे. त्यामुळे आज पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळणार आहे. मात्र, दोघांपैकी एक संघ विजयी झाल्यास त्याची गुणसंख्या 6 होणार आहे.

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.

बांगलादेश संघ:

नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसेन, मोसाद्दिक हुसेन, नुरुल हसन, यासिर अली, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद.


हेही वाचा – टी-20 विश्वचषकातील ‘हा’ संघ अद्याप अपराजित!