टी-20 विश्वचषक : नामिबियाचा 55 धावांनी श्रीलंकेवर दमदार विजय

टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली असून, पहिल्याच सामन्यात अतितटीची लढत पाहायला मिळाली. टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झाला. या सामन्यात नामिबियाच्या नवख्या संघाने 55 धावांनी श्रीलंकेला पराभूत केले.

टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली असून, पहिल्याच सामन्यात अतितटीची लढत पाहायला मिळाली. टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झाला. या सामन्यात नामिबियाच्या नवख्या संघाने 55 धावांनी श्रीलंकेला पराभूत केले. विशेष म्हणजे नुकताच झालेल्या आशिया चषकाचे जेतेपद श्रीलंकाने पटकावले होते. (T20 World Cup 2022 Namibia beat sri lanka by 55 runs)

ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी-20 विश्वचषकाला दमदार सुरुवात झाली आहे. श्रीलंका आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून नामिबियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर नवख्या नामिबियाच्या संघाने सुरुवातीच्या पडझडीतून सावरत श्रीलंकेसमोर 164 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगली सुरूवात करता आली नाही.

नामिबियाच्या गोलंदाजीवेळी दुसऱ्याच षटकात कुशल मेंडिस (6) बाद झाला. त्यानंतर बेन शिकोंगोने निसंका (9) आणि गुणतिलका शुन्यावर बाद झाला. त्यानंतर धनंजय डि सिल्व्हा बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भानुका राजपक्षे आणि दसून शणाका यांनी संगाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भानुका राजपक्षे (20) आणि दसून शणाका (29) धावा केल्या. मात्र राजपक्षे बाद झाल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी पुन्हा कोसळली. हसरंगा (४), शणाका (29), मदुशान (0) आणि करुणारत्ने (5) हे फलंदाज स्वस्त:त बाद झाल्यानंतर श्रीलंकेची अवस्था 9 बाद 92 अशी झाली होती.

अखेरीस चमिरा बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा डाव 108 धावांवर संपुष्टात आला. नामिबियाकडून स्कोल्ट्झ, शिकोंगो, फ्रायलिंक आणि वाईज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स टिपले, तर स्मित याने एक विकेट घेतल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. व्हॅन लिंगेन (3) आणि ला कूक (9) दोन्ही सलामीवीर 16 धावांमध्येच माघारी परतले. त्यानंतर इटोन (20), इरास्मस (20), ब्राड (26) आणि वाईस (0) बाद होत गेले. परंतू, अखेरच्या 34 चेंडूत फ्रायलिंक आणि जेजे स्मित यांनी 70 धावांची तुफानी भागीदारी केली. फ्रायलिंकने 28 चेंडूत 44 धावा केल्या. तसेच, जेजे स्मित याने 16 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.


हेही वाचा – IPL 2023 Auction : ‘या’ दिवशी होणार खेळाडूंचा लिलाव