विराट कोहलीची T20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावसंख्या; 220 च्या सरासरीने केल्या रन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात चांगली खेळी खेळली. विराटने या सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताची धावसंख्या 20 षटकात 6 विकेट्सवर 184 धावांवर नेली.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषकातील बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात चांगली खेळी खेळली. विराटने या सामन्यात अर्धशतकी खेळी करत भारताची धावसंख्या 20 षटकात 6 विकेट्सवर 184 धावांवर नेली. या सामन्यात विराटने 44 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची खेळी केली. विराट कोहलीचे हे टी-२० विश्वचषकातील तिसरे अर्धशतक होते. या अर्धशतकी खेळीनंतर विराट विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

कोहलीशिवाय केएल राहुलनेही या सामन्यात चांगली खेळी खेळली आणि त्याने 32 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. (t20 world cup 2022 virat kohli hit most runs in t20 world cup 2022)

टी-20 विश्वचशकात विराट कोहली याने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये नाबाद ८२, नाबाद ६२, १२ आणि नाबाद ६४ धावा केल्या आहेत. म्हणजेच 4 सामन्यांत त्याने 3 अर्धशतके झळकावली असून, तिन्ही वेळेला नाबाद राहिला आहे. त्याचप्रमाणे टी-20 2022च्या विश्वचषकात त्याच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद झाली आहे. कोहलीने आतापर्यंत 4 सामन्यांच्या 4 डावात 220 च्या सरासरीने 220 धावा केल्या आहेत.

कोहलीने मोडला सचिनचा विक्रम

ऑस्ट्रेलियात विराट कोहली आंतररराष्ट्रीय फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर चौथ्या क्रमांकावर होता, मात्र आता तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. तसेच, डेस्मन हेन्स दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 4238 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 आंतरराष्ट्रीय फलंदाज

  • 4529 धावा – व्हिव्ह रिचर्ड्स
  • 4238 धावा – डेसमंड हेन्स
  • 3370 धावा – ब्रायन लारा
  • 3350 धावा – विराट कोहली
  • 3300 धावा – सचिन तेंडुलकर

हेही वाचा – अर्शदीपच्या जबरदस्त खेळीनं भारताचा बांगलादेशवर विजय, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित