Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा T20 world cup BA vs WI : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्टइंडीजने...

T20 world cup BA vs WI : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्टइंडीजने ३ धावांनी मारली बाजी

Subscribe

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात वेस्टइंडीजने ३ धावा राखून विजय मिळवला

 

टी २० विश्वचषकात बांगलादेशविरूध्द वेस्ट इंडीजचा सामना फारच रोमांचक ठरला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात वेस्टइंडीजने ३ धावा राखून विजय मिळवला. वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १४२ धावा करून बांगलादेशला १४३ धावांचे आव्हान दिले. वेस्टइंडीजकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली, त्यापाठोपाठ रोस्टन चेसने ३९ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येला उभारी दिली. वेस्टइंडीजचे आक्रमक फलंदाज ख्रिस गेल, इवन लुइस आणि शिमरन हेटमायर स्वस्तात परतले.

- Advertisement -

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशकडून आक्रमक गोलंदाजी पहायला मिळाली, महेदी हसन, मुस्ताफिजूर रहिमान आणि शोरफुल इस्लाम यांनी प्रत्येकी २ बळी पटकावून वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला सुरूवातीपासूनच ब्रेक लावून धरला. वेस्टइंडीजकडून सर्वच गोलंदाजांकडून शानदार गोलंदाजी पहायला मिळाली. रवी रामपॉल, जेसन होल्डर,आंद्रे रसेल, अकील होसेन, आणि ड्वेन ब्रावो यांनी प्रत्येकी १-१ बळी पटकावत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. शेवटच्या षटकापर्यंत सामन्याची लढत पहायला मिळाली, बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाहने ड्वेन ब्रावोच्या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारून बांगलादेशी चाहत्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या पण तो प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला.

बांगलादेशचा आजचा संघ

- Advertisement -

महमुदुल्लाह (कर्णधार), अफिफ हुसैन, नुरूल हसन, लिटन दास, मोहम्मद नईम, शाकिब अल हसन, मुशफिकर रहीम, महेदी हसन, नसुम अहमद, मुस्ताफिजूर रहिमान, शोरफुल इस्लाम,

वेस्ट इंडीजचा आजचा संघ

एविन लुईस, ख्रिस गेल, निकोलस पूरन, शिमरन हेटमायर, कायरन पोलार्ड (कर्णधार), आंद्रे रसेल, ड्वेन ब्रावो, अकील होसेन, रवी रामपॉल, जेसन होल्डर, रोस्टन चेस,

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -