घरक्रीडाT-20 World Cup : कर्णधारासंदर्भात BCCI सचिव जय शहा स्पष्ट म्हणाले...

T-20 World Cup : कर्णधारासंदर्भात BCCI सचिव जय शहा स्पष्ट म्हणाले…

Subscribe

आश्विन 37 वर्षांचा असून त्यांने वनडे कर्णधार रोहित शर्मा हा 36 वर्षाचा आहे, तर विराट कोहली हा 35 वर्षाचा झाले असून या तिघांनी टी - 20 सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी अॅडलेडमध्ये इंग्लंडविरूद्ध सामना खेळले आहेत

मुंबई : टी 20 विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे. टी 20 विश्वचषक हे जून महिन्यामध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसमध्ये खेळले जाणार असून यासाठी अवघे काही महिने शिल्लक राहिलेले आहे. नुकतेच भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळली आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन त्यांच्या विरूद्ध तीन टी 20 सामन्याची मालिका खेळली आहे. पण टी 20 विश्वचषकमध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल, याबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही. पण रोहित शर्मा वन डे, टेस्ट आणि टी 20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये बसणार कर्णधार आहे. पण रोहित शर्माने गेल्या वर्षभरात देशासाठी एकही टी 20 सामना खेळला नाही.

जय शहा यांनी शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषदे घेण्यात आली होती. टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल आणि अफगाणिस्थानविरूद्ध टी-20 या मालिका आहे. यामुळे आता टी- 20 विश्वचषकच्या कर्णधार पदासंदर्भात खुलासा करण्याची गरज काय? असा उलट सवाल जय शहांनी माध्यमांना केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – WPL Auction 2024 : भारताच्या दोन तर ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूवर धनवर्षा; मूळ किमतीपेक्षा 20 पटीने जास्त बोली

 द्रविडच्या मुख्य प्रशिक्षक कार्यकाळासंदर्भात ‘या’ दौऱ्यानंतर निर्णय

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुलच्या कार्यकाळासंदर्भात जय शहा म्हणाले, आम्ही राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवला आहे. पण अद्याप ही त्याबद्दल करार निश्चित केलेला नाही. याबाबत आमच्याकडे वेळ नव्हता. यामुळे मी द्रविड आणि स्पोर्ट स्टाफसोबत झालेल्या बैठकीत परस्पर संमतीने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यास मंजूर दिली. यासंदर्भात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परतल्यानंतर आम्ही परत भेटून निर्णय घेऊ.”

- Advertisement -

हेही वाचा – Kevin Pietersen : “मी IPL लिलावात उतरलो तर कसं राहिल?” इंग्लंडच्या माजी खेळाडूची इच्छा व्यक्त…

वर्षभरापूर्वी खेळले टी-20 सामना

आश्विन 37 वर्षांचा असून त्यांने वनडे कर्णधार रोहित शर्मा हा 36 वर्षाचा आहे, तर विराट कोहली हा 35 वर्षाचा झाले असून या तिघांनी टी – 20 सामना 10 नोव्हेंबर 2022 रोजी अॅडलेडमध्ये इंग्लंडविरूद्ध सामना खेळले आहेत आणि तो टी-20 वर्ल्ड कप 2022चा सेमीफायनल सामना होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -