Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा T20 World Cup : भारताऐवजी युएई अन् ओमानमध्ये टी-२० वर्ल्डकप? 'हे' ठरू...

T20 World Cup : भारताऐवजी युएई अन् ओमानमध्ये टी-२० वर्ल्डकप? ‘हे’ ठरू शकेल कारण

टी-२० वर्ल्डकपला ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.

Related Story

- Advertisement -

भारतामध्ये यंदा होणारा टी-२० वर्ल्डकप भारताबाहेर हलवण्यात येण्याची शक्यता आहे. भारतामधील कोरोनाच्या स्थितीचा अंदाज बांधणे अवघड असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) टी-२० वर्ल्डकप युएई आणि ओमानमध्ये आयोजित करण्याच्या तयारीला लागण्यास सांगितले असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकाऱ्याने दिली. टी-२० वर्ल्डकपला ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होणार असून तोपर्यंत भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल याची बीसीसीआयला खात्री नाही. भारतात ही स्पर्धा आयोजित करणे शक्य न झाल्यास आयसीसीने युएईचा पर्याय समोर ठेवला होता. युएईतील अबू धाबी, दुबई आणि शारजाह या ठिकाणांप्रमाणाचे आता ओमानची राजधानी मस्कत येथेही टी-२० वर्ल्डकपचे सामने आयोजित करण्याचा आयसीसी विचार करत आहे.

आयोजनाचे हक्क आपल्याकडेच ठेवणार

आयसीसीच्या मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत बीसीसीआयने टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी मागून घेतला होता. बीसीसीआयला आयोजनाचे हक्क आपल्याकडेच ठेवायचे असले तरी ही स्पर्धा भारताऐवजी युएई आणि ओमानमध्ये घेण्याची त्यांची तयारी आहे, असे सिनियर अधिकारी म्हणाला.

पहिल्या आठवड्यात सामने ओमानमध्ये 

- Advertisement -

आयपीएलचा उर्वरित मोसम युएईत पार पडणार आहे. १० ऑक्टोबरला या स्पर्धेची सांगता होईल. त्यानंतर युएईत टी-२० वर्ल्डकपचे सामने नोव्हेंबरपासून खेळवले जाऊ शकतील. त्यामुळे खेळपट्ट्या तयार करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी मिळेल. टी-२० वर्ल्डकपचे पहिल्या आठवड्यातील सामने ओमान येथे खेळवले जाऊ शकतील, असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -