T20 world cup 2021: NZ VS SCO न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय; स्कॉटलँडचे आव्हान संपुष्टात

टी-२० विश्वचषकात बुधवारी झालेल्या न्यूझीलंडविरूध्द स्कॉटलँडच्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलँडचा १६ धावांनी पराभव केला

स्कॉटलँडला नमवत सामन्यात न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय
स्कॉटलँडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

टी-२० विश्वचषकात बुधवारी झालेल्या न्यूझीलंडविरूध्द स्कॉटलँडच्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलँडचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच न्यूझीलंडने विश्वचषकातील सलग दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याच्या स्पर्धेत आपले स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सुरूवातीपासूनत आक्रमक खेळी पहायला मिळाली. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्टिलने सर्वाधिक ९३ धावांची खेळी करून संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले.

तत्पुर्वी, स्कॉटलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलँडकडून सावध गोलंदाजी पहायला मिळाली. पण मार्टिन गुप्टिलच्या आक्रमक फलंदाजी समोर स्कॉटलँडचे गोलंदाज अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. गुप्टील पाठोपाठ ग्लेन फिलिप्सने ३३ धावांची सावध खेळी करून गुप्टिलला साथ दिली. स्कॉटलँडकडूने आक्रमक फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला चांगलीच झुंज दिल्याचे पहायला मिळाले. शेवटच्या काही षटकांत मायकेल लीस्कने आक्रमक फलंदाजी करत २० चेंडूत ४२ धावा केल्या पण त्याची झुंज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. स्कॉटलँडकडून ब्रॅड व्हील आणि सफायान शरीफ यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. तर मार्क वॅटला १ बळी घेण्यात यश आले.

न्यूझीलंडकडून ट्रेंन्ट बोल्ट आणि इश सोधीने प्रत्येकी २-२ बळी घेत सामन्यावर पकड मिळवली. तर टिम साउदीला एक बळी घेण्यात यश आले. याविजयासोबतच न्यूझीलंडने सलग दुसरा सामना जिंकला.
स्कॉटलँडच्या संघाचा आपल्या पहिल्या दोन्हीही सामन्यात पराभव झाला होता. सोबतच न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात झालेल्या दारूण पराभवाने संघाचे उपांत्य फेरी गाठण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर न्यूझीलंडने ४ अंकासह उपांत्य फेरीच्या स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवले आहे.