घरक्रीडाT20 World Cup : श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव करत न्यूझीलंड अ गटाच्या...

T20 World Cup : श्रीलंकेचा 65 धावांनी पराभव करत न्यूझीलंड अ गटाच्या अव्वल स्थानी

Subscribe

टी-20 विश्वचषकातील आजचा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झाला. या सामन्यात श्रीलंकेचा 65 धावांनी न्यझीलंडने पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडचा संघ टी-20 विश्वचषकातील अ गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

टी-20 विश्वचषकातील आजचा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झाला. या सामन्यात श्रीलंकेचा 65 धावांनी न्यझीलंडने पराभव केला आहे. या विजयासह न्यूझीलंडचा संघ टी-20 विश्वचषकातील अ गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तसेच, श्रीलंका तीन सामन्यातील एक सामना जिंकून 2 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. (T20 World Cup Updated Group 1 Points Table After New Zealand Beat Sri Lanka)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 167 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने 104 धावांची शतकी खेळी करत संघाला 167 धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर न्यूझीलंडने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला 168 धावांचे आव्हान पेलवले नाही. परिणामी श्रीलंकेचा संपूर्ण संघ 102 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने सुपर 12 फेरीच्या अ गटामध्ये 5 गुणांसह आपले अव्वल स्थान ठेवले.

- Advertisement -

न्यूझीलंडकडून फलंदाज ग्लेन फिलिप्सने झुंजार 104 धावांची शतकी खेळी करत संघाला 167 धावांपर्यंत पोहचवले. तसेच, गोलंदाजीवेळी न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 4 तर मिचेल सँटनरने 2 विकेट घेतल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना एकट्या ग्लेन फिलिप्सने धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडला 150 चा टप्पा पार करून दिला. त्याला डॅरेल मिचेलने 22 तर सँटनरने 11 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने 2 तर हसरंगा, तिक्षाणा, डिसिल्वा आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सची तुफानी खेळी; टी-20 विश्वचषकात शतक ठोकत बनवला नवा विक्रम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -