Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा T20 World Cup: ...तर वर्ल्डकप भारतात नको रे बाबा, म्हणाला ऑस्ट्रेलियन खेळाडू 

T20 World Cup: …तर वर्ल्डकप भारतात नको रे बाबा, म्हणाला ऑस्ट्रेलियन खेळाडू 

क्रिकेट प्रशासकांनी भारत सरकारसोबत मिळून काम केले पाहिजे, असेही या खेळाडूला वाटते.  

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाने बायो-बबलमध्येही शिरकाव केल्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. तसेच यंदा भारतातच होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपवरही आता प्रश्नचिन्ह आहेत. टी-२० वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार असून याच काळात भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडू आणि स्पर्धेशी निगडित लोकांच्या जीवाला धोका असल्यास यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होता कामा नये, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला वाटते.

आताच काहीही सांगणे अवघड

भारतातील सुविधा आणि यंत्रणांवर ताण येणार असेल किंवा खेळाडू आणि स्पर्धेशी निगडित लोकांच्या जीवाला कोणताही धोका असल्यास टी-२० वर्ल्डकपचे आयोजन भारतात होऊ शकत नाही. टी-२० वर्ल्डकपला अजून साधारण सहा महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आताच काहीही सांगणे अवघड आहे. परंतु, क्रिकेट प्रशासकांनी भारत सरकारसोबत मिळून काम केले पाहिजे. भारतीय लोकांच्या हिताचाही विचार झाला पाहिजे, असे कमिन्स एका मुलाखतीत म्हणाला.

बीसीसीआयला दोष देणे चुकीचे

- Advertisement -

यंदा आयपीएल स्पर्धा भारतात आयोजित करण्यावरून बीसीसीआयवर बरीच टीका होत आहे. परंतु, त्यांनी सर्व अनुभवी लोकांचे सल्ले घेतल्यानंतरच भारतात आयपीएल स्पर्धा घेण्याचा विचार केला असणार आणि त्यांना दोष देणे चुकीचे ठरेल, असे कमिन्सने नमूद केले. तसेच लोक या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी का होईना, पण घरी थांबत होते. त्यामुळे ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय योग्यच होता, असे कमिन्सला वाटते. कमिन्स या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता.

- Advertisement -