घरक्रीडाऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने धोनीचा विश्वविक्रम मोडला

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने धोनीचा विश्वविक्रम मोडला

Subscribe

सध्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा असून आज ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंडन विरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामना झाला. तीन सामन्याच्या सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात यजमान टीम विजयी झाली. सामन्यात २-० अशी आघाडी मिळवून विजय प्राप्त केला. ऑस्ट्रेलियाने १६.४ ओव्हरमध्ये १२९/२ धावा करत सामान्यात ८ गडी राखले. रविवारी ब्रिस्बेनच्या एलने बॉर्डर फील्डमध्ये खेळलेल्या सामना ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपर अलिसा हेलिच्या विश्वविक्रमामुळे स्मरणीय ठरला.

३० वर्षीय अलिसा हेलीने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सर्वोत्तम विकेटकीपर म्हणून मागे टाकले असून तिने विश्वविक्रम केला आहे. या सामन्यात अलिसा हेलीने दोन गडी बाद करून खास विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये तिच्या खात्यात आता ९२ विकेट्स झाल्या आहेत. धोनीने ९१ गडी बाद केले असून त्यामध्ये ५४ कॅच आणि ३४ स्टंपिंगचा समावेश आहे. तर अलिसा हेलीने ९२ गडी बाद केले असून यामध्ये ४२ कॅच आणि ५० स्टंपिंगचा समावेश आहे. त्यामुळे आता अलिया हेली आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील सर्वोत्तम विकेटकीपरच्या (पुरुष आणि माहिला) यादीत अव्वल स्थानावर आहे. तर इंग्लंडची सारा टेलर ही महिलाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिने एकूण ७४ गडींना बाद केले आहे.

- Advertisement -

इतके नव्हे तर हेलीने विकेटकीपर म्हणून धोनीचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्याचा विक्रमही मोडला आहे. हेलीचा आताचा ९९ वा सामना होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने ९८ व्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

- Advertisement -

विशेष म्हणजे अलिसा हेली ऑस्ट्रेलियाची स्टार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची पत्नी आहे. दोघांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. अलिसाला क्रिकेटचा वारसा मिळाला आहे. ती ऑस्ट्रेलियाची माजी विकेटकीपर इयान हेलीची भाची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -