T20 WC: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहलीची गोलंदाजी, हार्दिक पांड्यामुळे गोलंदाजीत वाढली चिंता

virat kohli statement on mohammed shami and hardik pandya feet
IND vs NZ: न्यूझीलंड विरूद्ध सामन्यासाठी हार्दिक पांड्या फिट, विराट कोहलीची माहिती

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. यापुर्वी भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा सराव सामना खेळवण्यात आला आहे. परंतु भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. भारताचा स्टार गोलंदाज हार्दिक पांड्याने सराव सामन्यात गोलंदाजी न केल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सराव सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही. यामुळे विराट कोहलीला गोलंदाजी करावी लागली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व रोहित शर्माने केलं आहे. रोहित शर्माने नाणेफेकीदरम्यान सांगितले की, हार्दिक पांड्याने अजून गोलंदाजी करण्यास सुरुवात केली नाही. पांड्याची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे संघाला विश्वास आहे की, लवकरच हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यास सुरुवात करेल असे रोहित शर्मा याने म्हटलं आहे. टी२० वर्ल्डकपच्या सुरुवातीपासूनच पांड्या गोलंदाजी करेल अशी शक्यता असल्याचे रोहित शर्माने सांगितले. संघाकडे सध्या चांगले गोलंदाज आहे परंतु सहावा गोलंदाज असणे महत्त्वाचे आहे. अशातच संघात असलेल्या फलंदाजांनाही संधी देण्यात येईल.

रोहित शर्माने नाणेफेकदरम्यान केलेल्या वक्तव्यानंतर विराट कोहली मैदानात उतरल्यावर गोलंदाजी करण्याकडे आपला मोर्चा वळवला. विराट कोहलीने आपल्या दोन षटकांमध्ये १२ धावा दिल्या आहेत. हार्दिक पांड्या दुखापतीनंतर संघात परतला आहे. आयपीएलमध्येही हार्दिक पांड्या गोलंदाजी केली नाही. हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे प्लेइंग-११ मध्ये जागा निश्चित करु शकेल का नाही अशी चर्चा सुरु होती. यामुळे आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे की, भारतीय संघ कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरणार.


हेही वाचा : Virat Kohli: दुबईच्या मादम तुसाद म्युझियममध्ये उभारला विराट कोहलीचा मेणाचा पुतळा