घर क्रीडा Table Tennis : सुवर्णसंधी; वयाच्या 80 व्या वर्षीही घेता येणार टेबल टेनिसचा...

Table Tennis : सुवर्णसंधी; वयाच्या 80 व्या वर्षीही घेता येणार टेबल टेनिसचा आनंद, मुंबईत स्पर्धा

Subscribe

मुंबई : हे तुमचे वयच नव्हे असा वयोवृद्धांना नेहमीच टोमणा मारला जातो, मात्र आता वयाच्या 80 तही टेबल टेनिस खेळण्याचा आनंद वृद्ध मुंबईकरांना घेता येणार आहे. ही सुवर्णसंधी बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारितीतील ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ यांनी आयोजित केलेल्या टेबल टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने मिळाली आहे. मुलुंड परिसरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकूल येथे भव्य स्तरावर टेबल टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र मास्टर टेबल टेनिस समिती’ यांच्या सहकार्याने संयुक्तपणे होणाऱ्या या स्पर्धा 19 आणि 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत होणार आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानद्वारे देण्यात आली आहे. (Table Tennis Golden Chance Enjoy table tennis even at the age of 80 competition in Mumbai)

हेही वाचा – Rishabh Pant : अपघातानंतर पुन्हा मैदानात परतला ऋषभ पंत; मोठे फटके मारून सर्वांनाच केले चकीत

- Advertisement -

बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात महापालिका प्रशासनाद्वारे मुंबईकरांना सेवा-सुविधा देण्यासोबतच इतरही विविध उपक्रम घेण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून प्रसिद्ध टेनिसपटू स्व. कुमुद कुमार राय उर्फ के. के राय यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस स्पर्धा भरविण्यात येणार आहेत, असे प्रतिष्ठानचे विशेष कार्याधिकारी सुनील गोडसे यांनी कळविले आहे.

स्व. राय हे ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’चे खेळाडू होते. याच ठिकाणी सराव करून राय यांनी प्रतिष्ठानतर्फे अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन विजय मिळवत मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. त्यांनी 40+ आणि 50+ वयोगटातील स्पर्धेत विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी अनेक ट्रॉफी जिंकल्या होत्या. पेनहोल्डरच्या पकडीसह खेळणारा महाराष्ट्रातील स्टायलिश टेनिसपटू म्हणून त्यांना ओळखले जात होते.

- Advertisement -

हेही वाचा – Asia Cup 2023 : भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाने केली निवृत्ती जाहीर

स्व. राय यांनी त्यांच्या टेनिस कारकीर्दीत तब्बल 40 वर्षे टेबल टेनिस हा खेळ खेळला असून त्यांनी विविध आशियाई आणि जागतिक टेनिस स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत अनेक बक्षिसे जिंकली. अशी अलौकीक कामगिरी असलेल्या स्व. के. के. राय यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा भरविल्या जात आहेत. राज्यभरातून या स्पर्धेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

39 ते 80 या वयोगटासाठी या स्पर्धा होणार आहे. या स्पर्धांबाबत अधिक माहितीसाठी नंदकुमार नाईक (दूरध्वनी क्रमांक- 8355-892-698) आणि अविनाश कोठारी (दूरध्वनी क्रमांक – 9821-227-485 ) यांच्याशी संपर्क साधावा, असेही बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे.

- Advertisment -