घरक्रीडाताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प घरासारखे वाटते; क्रिकेटचा देव पाचव्यांदा जंगल सफारीवर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प घरासारखे वाटते; क्रिकेटचा देव पाचव्यांदा जंगल सफारीवर

Subscribe

नागपूर : क्रिकेट देव भारतरत्न सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) जंगली सफारीचे भलतेच वेड असल्याचे समोर येत आहे. खासकरून  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (Tadoba Andhari Tiger Reserve) कारण त्याने या प्रकल्पाला पाचव्यांदा आणि यावर्षी दुसऱ्यांदा भेट दिली आहे. याबद्दल त्याला विचारले असता त्याने सांगितले की, या प्रकल्पात आल्यावर घरासारखे वाटते.

सचिन तेंडूलकर पत्नी अंजली आणि काही मित्रांसोबत गुरुवारी (4 मे) ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. सचिनला ताडोबातील विविध नावांनी प्रसिद्ध असलेल्या अनेक वाघ वाघिणींना पाहण्याचे वेड लागले आहे. चार दिवसांच्या मुक्कामानंतर सचिन रविवारी (7 मे) नागपूरहून मुंबईला परतला. यावेळी त्याला प्रकल्पाला भेट दिल्याबद्दल विचारले असताना त्याने प्रतिक्रिया दिली की, येथे आल्यावर मला घरासारखे वाटते.

- Advertisement -

सचिन तेंडुलकरला क्रिकेटसोबतच जंगल सफारीचे भारी वेड आहे. देश, राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्पांला त्याने भेट दिली आहे, पण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी त्याला सर्वाधिक भुरळ पाडलयाचे समोर आहे. कारण सचिनने पाच वेळा या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि विशेष म्हणजे अडीच महिन्यांपूर्वी तो ताडोबामध्ये येऊन गेला होता.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्राणी गणना होते. याचा वेगळा अनुभव घेण्यासाठी सचिनने या जंगल सफारीचे नियोजन केले होते. त्याने सांगितले की, प्रत्येक सफारीमध्ये वेगवेगळा अनुभव येत असल्यामुळे ताडोबा जंगल सफारीचे पुन्हा पुन्हा नियोजन करतो.

- Advertisement -

सचिनने गुरुवारी आल्यावर सर्वात प्रथम लहान ताराचे दर्शन घेतले. यानंतर त्याने चार दिवसाच्या सफारीमध्ये मोगली, युवराज तथा भाणुसखिंडीच्या पिल्लांचे दर्शन घेतले. वाघांच्या दर्शनासोबतच त्याने अस्वल, रानडुक्कर, हरिण, सांबर, कोल्हे, रानगवा आदी प्राण्यांचा मुक्त संचार त्याला अनुभवता आला, मात्र बिग फाइव्ह म्हणून व्याघ्र प्रेमीमध्ये प्रसिद्ध असलेली भानुसखिंडी व तिचे चार बछड्यांचे एकत्रित दर्शन त्याला करता आले नाही.

मुनगंटीवार यांच्याकडून सचिनला वाघाची प्रतिकृती आणि बांबू डायरी भेट
राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्य  व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सचिन तेंडुलकर याला वाघाची प्रतिकृती व एक बांबू डायरी भेट स्वरुपात दिली आहे. या बांबू डायरीच्या पहिल्या पानावर सचिन व त्याचे आईचे फोटो आहेत. मुनगंटीवार यांचे स्विय सहायक संतोष अतकरे, प्रकाश धारणे, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, ताडोबाचे फील्ड ऑफिसर डॉ.जितेंद्र रामगावकर, बफरचे उपचांचालक कुशाग्र पाठक यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -