घरक्रीडाICC T-20 World Cup 2021-बांग्लादेश संघाला टी- ट्वेंटी स्पर्धेआधीच मोठा धक्का

ICC T-20 World Cup 2021-बांग्लादेश संघाला टी- ट्वेंटी स्पर्धेआधीच मोठा धक्का

Subscribe

तमिम इकबालची टी-ट्वेंटी विश्वचषकातून माघार

यंदा ऑक्टोबर – नोव्हेबर महिन्यात टी-२० विश्वचषक (UAE) दुबईत पार पडणार आहे. भारताकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. जगभरातल्या संपुर्ण क्रिकेट रसिकांचे लक्ष टी-२० विश्वचषकाकडे लागले आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ ची सुरुवात येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. टी-२० विश्व चषकासाठी सर्व देश आपल्या सामन्यांसाठी सज्ज असतानाच बांग्लादेश संघाला मात्र मोठा धक्का बसला आहे. बांग्लादेश संघाचा सलमीचा फलंदाज तमीम इकबाल याने २०२१ टी-२० विश्वचषक खेळणार नसल्याचे सांगितले आहे. स्पर्धेतून माघार घेतानाच तमीम इकबालने एक कारण पुढे केले आहे.

जे बांग्लादेशी खेळाडू उत्तम खेळत त्या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी तो टी-२० विश्वचषकातून माघार घेत असल्याचे कारण त्याने स्पष्ट केले आहे. तमीम इकबाल ने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. तमीम इकबालने आपला शेवटचा टी-२० सामना २० जूलै २०२० ला झिंबाब्वे विरुद्ध खेळला आहे. बांग्लादेशसाठी ७८ टी-२० सामन्यांमध्ये २४.०८ च्या सरासरीने १७५८ धावा केल्या आहेत.आंतरराष्ट्रीय टी-२० च्या एका सामन्यात १०३ सर्वाधिक धावा त्याने केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याच्या नावे सात अर्धशतक आणि एक शतकी खेळी आहे.

- Advertisement -

तमीम इकबाल असा एकमेव बांग्लादेशी खेळाडू आहे ज्याने भारताविरुद्ध उत्तम कामगिरी केली आहे. भारतीय संघ आणि प्रेक्षक २००७ क्रिकेट विश्वचषक कधीच विसरु शकत नाही.सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, युवराज सिंह, राहुल द्रविड़ यांसारखे दीग्गज खेळाडू खेळत असताना देखील १९१ धावांवर गारद करत भारताला बांग्लादेशने नमवले याच सामन्यात तमीम इकबाल याने महत्वाची अर्धशतकीय खेळी साकारली होती.

डावखुरा सलामीचा फलंदाज तमीम इकबाल आपल्या धमाकेदार खेळासाठी लोकप्रिय आहे. त्यातच तो २०२१ च्या टी-२० विश्वचषकात खेळत नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच बांग्लादेश संघ विश्वचषकात तमीम इकबाल शिवाय कशी कामगिरी साकारेल हे पहावे लागेल.

- Advertisement -

हे ही वाचा – IPL 2021- सप्टेंबर महिन्यात पुन्हा रंगणार IPL चा थरार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -