ENG VS IND 4th Test : टीम इंडिया विजयापासुन २ विकेटस् दूर

भारतीय गोलंदाजांनी केली कमाल

भारतीय गोलंदाजांनी केली कमाल

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना द ओव्हल, लंडन येथे खेळला जात आहे. आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडच्या सलामीवीरांनी रॉरी बर्नस् ५० धावा हासीब हामीद ६३ धावा दोघांची शतकिय भागीदारी आणि इंग्लंडला दमदार सुरुवात करून भारताला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारताने इंग्लंडचा पहीला गडी १०० धावांवर तर दुसरा गडी १२० धावा असताना धावचीत स्वरुपात बाद केला. भारतीय संघ क्षेत्ररक्षणात लडबडताना दिसला. क्षेत्ररक्षणात सिराज ने इंग्लंडच्या हसीब हमीद चा झेल सोडला. त्यावेळी हमीद ६२ धावांवर खेळत होता.

हमीदला तंबूत धाडण्यासाठी टीम इंडियाकडे सुवर्णसंधी होती. फिरकीपटू रवींद्र जडेजा ४८वे षटक टाकत असताना. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हमीद ऑन ड्राइव्ह शॉट खेळत असताना. मोहम्मद सिराजने हमीदचा सोपा झेल सोडला. सिराजने सोडलेल्या या झेल नंतर रवींद्र जडेजा नाराज झालेला दिसला. त्यानंतर रवींद्र जडेजानेच हमीदला बाद केले.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट एकाकी झुंज देण्यासाठी खेळपट्टीवर ठाण मांडुन बसला होता तो ३६ धावा करुन बाद झाला. तर एकीकडे इंग्लंडचे फलंदाज ही बाद होताना दिसले. हमीद नंतर ओली पोप अवघ्या दोन धावांवर बाद झाला, त्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि मोईन अली यांना खातेही उघडता आले नाही. वोक्स १८ धावांवर बाद झाला तर इंग्लडचा गोलंदाज ओव्हरटन सध्या खेळत आहे.


हेही वाचा : ICC T20 WORLD CUP : पाकिस्तान संघाला मोठा धक्का, मिस्बाह आणि वकार युनूस यांचा राजीनामा

ENG VS IND TEST 4TH : टीम इंडिया इतिहास घडवणार? ५० वर्षाचा विक्रम मोडण्याची संधी