IND vs SA 3rd Test : टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांत आटोपला, कोहलीचं अर्धशतक

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्ण झाला. यामध्ये टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांत आटोपला असून कर्णधार विराट कोहलीने ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. तर चेतेश्वर पुजाराने ४३ धावा काढल्या आहेत. दोन्ही संघातील मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेतून कगिसो रबाडाने चार आणि मार्को जॅन्सनने टीम इंडियाचे ३ गडी बाद केले आहेत.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल या जोडीने ३१ धावांपर्यंत भागेदारी केली. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाचा डाव सावरला. पुजाराने ७ चौकार लगावत ४३२ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने फक्त ९ धावा केल्या. परंतु चहापानानंतर १६७ धावांमध्येच टीम इंडियाचे ५ गडी बाद झाले. त्यानंतर टीम इंडियाचे एका पाठोपाठ एक खेळाडू बाद झाले.

असा आहे उभय संघ –

टीम इंडिया – 

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन.

दक्षिण आफ्रिका –

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, टेम्बा बावुमा, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी.


हेही वाचा : Mumbai Police : विनामास्क फिरणाऱ्या १०० जणांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांना टार्गेट