घरक्रीडावेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा कर्णधार, कोहलीला डच्चू

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा कर्णधार, कोहलीला डच्चू

Subscribe

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिकेचे दोन सामने अद्यापही बाकी आहेत. ही मालिका संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला आहे. परंतु यामध्ये मालिकेत रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून विराट कोहलीच्या जागी नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी असेल टीम इंडिया –

रोहित शर्मा(कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई , कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

- Advertisement -

विराट कोहलीचा सध्या खराब फॉर्ममध्ये असल्याची जोरदार चर्चा होती. तसेच त्याने इंग्लंड दौऱ्यावर कोणत्याही प्रकारची शतकीय खेळी केली नव्हती. त्यामुळे त्याला पुढील सामन्यात संधी मिळणार की नाही?, याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलं होत. विराटने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जरीही तो कठीण काळातून जात असला तरीदेखील तो चांगली फलंदाजी करू शकतो, असं सौरव गांगुली म्हणाला होता. परंतु गांगुली यांच्या स्टेटमेंटनंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्ध नव्या टीमची घोषणा केली असून कोहलीला डच्चू देण्यात आला आहे.


हेही वाचा : तो लवकरच फॉर्ममध्ये येईल.., कठीण काळात सौरव गांगुलीचा कोहलीला पाठिंबा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -