दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा दणदणीत विजय

team india 1

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA) यांच्यात पाच टी-२० सामन्यांची (T-20 Series) मालिका सुरू आहे. यामध्ये दोन सामने खेळण्यात आले असून या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला. त्यामुळे आजच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला करो वा मरो अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळत ४८ धावांनी त्यांचा पराभव केला आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा संघ निर्धारित २० षटकांमध्ये १३१ धावांवरच गारद झाला. भारतीय संघाकडून हर्षल पटलने ४ तर भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने ३ गडी बाद केले. तसेच फलंदाजीत ऋतुराज गायकवाडने ५७ तर इशान किशनने ५४ धावांची अर्धशतकीय खेळी केली.

भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये शानदार फटकेबाजी करत २१ चेंडूमध्ये ३१ धावा केल्या. त्यामुळे भारताचे पाच गडी बाद झाल्यानंतरही १७९ धावापर्यंत भारतीय संघाने मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज प्रेटोरियसने पंतला आणि कसिगो रबाडाने दिनेश कार्तिकला बाद करत भारताला दोन धक्के दिले. तर प्रेटोरियसने ३५ चेंडूत ५४ धावा करणाऱ्या इशान किशनला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.


हेही वाचा : मुंबईच्या रस्त्यावर रोहित शर्माचं गल्ली क्रिकेट, व्हिडिओ तुफान व्हायरल…