घरक्रीडाभारताच्या इंग्लंडदौऱ्यातील कसोटी मालिकेत इंग्लंड ४-१ ने विजयी

भारताच्या इंग्लंडदौऱ्यातील कसोटी मालिकेत इंग्लंड ४-१ ने विजयी

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर आता दौऱ्यातील अखेरची कसोटी मालिकाही भारताला ४-१ च्या फरकाने गमवावी लागली आहे.

भारताच्या ३ जुलैला सुरू झालेला इंग्लंड दौरा कसोटी मालिकेने संपला असून अखेरच्या कसोटी मालिकेत भारताला ४-१ च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि ५ कसोटी सामने खेळवले गेले. ज्यात टी-२० मालिकेत फक्त भारताने विजय मिळवला. टी-२० मध्ये भारताने २-१ च्या फरकाने विजय मिळवला. मात्र एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. ज्यात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ ने तर कसोटी मालिकेत ४-१ च्या फरकाने भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे.

- Advertisement -

असा झाला अखेरच्या कसोटीत पराभव

इंग्लंडने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात ३३२ धावा केल्या ज्याचा पाठलाग करत असताना भारताचा संघ २९२ धावांतच गारद झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडने ४२३ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडच्या ४६४ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ३४५ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून सलामीवीर लोकेश राहूल ने १४९ आणि रिषभ पंतने ११४ धावा करत शतक केली खरी इतर कोणत्याही बॅट्समनला काही खास कामगिरी करता न आल्याने भारत पराभूत झाला. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कूकला त्याच्या अप्रतिम शतकाकरीता सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

याआधी पहिल्या कसोटीत इंग्लंडने ३१ धावांनी विजय मिळवला तर दुसऱ्या कसोटीतही तब्बल १५९ धावांनी विजय मिळवल्यानंतर इंग्लंड मालिका जिंकतो असे वाटक असतानाच भारताने तिसऱ्या कसोटीत २०३ धावांनी तगडा विजय मिळवल्यानंतर भारतासाठी मालिका जिंकण्याच्या आशा निर्माण झाल्या मात्र चौथ्या कसोटीत इंग्लंडने ६० धावांनी विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने पाचव्या कसोटीपूर्वीच मालिका ३-१ च्या फरकाने जिंकली होती. यानंतर अखेरच्या औपचारीक कसोटीतही भारतला ११८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -