IPL 2022: आयपीएलमधील ‘हे’ दोन गोलंदाज भारतीय संघात करू शकतात पदार्पण

आयपीएलमळे आतापर्यंत भारताला अनेक मोठे खेळाडू भेटले आहेत. काही वर्षापूर्वी बुमराहच्या रुपात वेगवान गोलंदाज भारतीय संघाला मिळाला. त्याचप्रमाणे आयपीएलच्या १५ व्या पर्वातही असे 2 वेगवान गोलंदाज उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत.

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. आयपीएलमळे आतापर्यंत भारताला अनेक मोठे खेळाडू भेटले आहेत. काही वर्षापूर्वी बुमराहच्या रुपात वेगवान गोलंदाज भारतीय संघाला मिळाला. त्याचप्रमाणे आयपीएलच्या १५ व्या पर्वातही असे 2 वेगवान गोलंदाज उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पंजाब किंग्जचा अर्शदीप सिंग आणि सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक आपल्या गोलंदाजीने सर्वानाच प्रभावित करत आहेत.

अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांची गोलंदाजी बघता हे दोघेही भारतीय संघात पदार्पण करू शकतात. भारतीय संघाला खूप दिवसांपासून उमरान सारख्या खेळाडूच्या शोधात होते कारण टीमकडे वर्षानुवर्षे एकही गोलंदाज नव्हता जो इतक्या वेगाने चेंडू टाकू शकेल.

पंजाब किंग्जसाठी अनेक वर्षे आयपीएलमध्ये चमक दाखवणारा अर्शदीप सिंगसाठी आता टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची वेळ आली आहे. अर्शदीप आयपीएल 2022 मधील सर्वोत्तम डेथ बॉलर म्हणून उदयास आला आहे. या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करणे आतापर्यंत कोणत्याही फलंदाजासाठी सोपे नव्हते. आयपीएल 2021 मध्ये पंजाबसाठी अर्शदीप हा सर्वोत्तम गोलंदाज होता. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माला या खेळाडूला संधी द्यायला नक्कीच आवडेल. डेथ ओव्हर्समध्ये धावा वाचवण्याची त्याची क्षमता पाहता तो लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे, असा अंदाज लावला जाऊ शकतो. या 23 वर्षीय गोलंदाजाने आयपीएल 2019 मध्ये पदार्पण केले.

उमरान मलिक सध्या भारतातील आणि जगभरातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. या युवा गोलंदाजाकडे सतत 150 च्या वेगाने गोलंदाजी करण्याची उत्कृष्ट कला आहे. उमरानने बुधवारी सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध ५ बळी घेतले. त्याने चार षटकांत २५ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. याच कारणामुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

उमरान मलिकने आतापर्यंत 8 सामन्यात 15 बळी घेतले आहेत. उमरानकडे स्विंग, बाऊन्स आणि वेग हे तिन्ही आहेत, ज्यामुळे तो विरोधी फलंदाजांसाठी कॉलर बनतो. हा गोलंदाज आता पर्पल कॅपच्या यादीत सामील झाला आहे. उमरान मलिकने आयपीएल 2021 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने 155+ च्या वेगाने चेंडू टाकला. आयपीएलनंतर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये उमरान मलिकला संधी मिळू शकते.


हेही वाचा – IPL 2022: डग आऊटमध्ये बसलेल्या मुरलीधरनचे रौद्ररुप पाहिलंत का?; ‘या’ व्हायरल व्हिडीओची होतेय सर्वत्र चर्चा